Municipal Election Politics: जामनेर मध्ये बोगस मतदार पकडले, मतदानकंेद्रावर वाद, नर्सिंग कॉलेजच्या १५ विद्यार्थिनीकडे बोगस आधार कार्डची तक्रार!

Jamner Municipality Election Girish Mahajan BJP NCP Party supporters heated political Argumentative-नगरपालिका निवडणुकीत बोगस मतदानाच्या तक्रारी, पोलीस आणि कार्यकर्त्यांत बाचाबाचीने वातावरण तंग.
Jamner Bogus Voting
Jamner Bogus VotingSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News: जळगाव जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीत मोठी चुरस आहे. भाजप आणि विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जोरदार वाद सुरू आहेत. विविध मतदान केंद्रांवर त्याचे पडसाद उमटलेले दिसले.

जामनेर नगरपालिका निवडणुकीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. श्रीमती साधना गिरीश महाजन या नगराध्यक्ष पदाच्या भाजपच्या उमेदवार आहेत. त्या बिनविरोध निवडून आल्या आहेत.

आज मतदान सुरू झाल्यावर सकाळपासूनच सत्ताधारी भाजप आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये तणाव होता. यावेळी पोलिसांनी पक्षपाती भूमिका बजावल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष किशोर श्रीराम पाटील यांनी याबाबत पोलिस ठाण्यात लिखित तक्रार केली आहे.

Jamner Bogus Voting
Girish Mahajan : काय होतास तू, काय झालास तू, अरे येड्या कसा वाया गेलास तू?.. गिरीश महाजनांनी केली खडसेंवर कविता

प्रभाग क्रमांक दहा येथे एका बोगस मतदाराला मतदान करताना पकडले. प्रभाग क्रमांक नऊ मध्ये महिला मतदार मतदानाला गेली असता आधीच मतदान झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या महिलेने मतदान केंद्रावरच पोलिसांकडे तक्रार करून संताप व्यक्त केला. उमेदवार अविनाश बोरसे यांनी याबाबत तक्रार केली.

Jamner Bogus Voting
Aurangabad Central Assembly Election : मतदानाआधीच एमआयएमच्या उमेदवाराची पोलिसांकडे तक्रार; 'ही' भीती केली व्यक्त

येथील नरसिंग महाविद्यालयाच्या पंधरा विद्यार्थिनींना बोगस आधार कार्ड घेऊन मतदानाला आल्याचे प्रकरण घडले. रोशन विनोद चौधरी या बोगस मतदारालाही ताब्यात घेण्यात आले. यावेळी मोठा गोंधळ झाल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. बोगस मतदारांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले

मुक्ताईनगर येथेही पोलीस दुजाभाव करत असल्याची तक्रार होती. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडे तक्रार करण्यात आली. नंतर राज्यमंत्री खडसे यांनी मतदान केंद्रावर जाऊन पोलिसांना समज दिली. जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी मतदान केंद्रांवर सत्ताधारी भाजप आणि विरोधकां दरम्यान वाद झाला.

--------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com