Girish Mahajan : काय होतास तू, काय झालास तू, अरे येड्या कसा वाया गेलास तू?.. गिरीश महाजनांनी केली खडसेंवर कविता

Girish Mahajan On Eknath Khadse : कोणत्या चिन्हावर मते माघायची हे खडसेंना समजेना. एकेकाळचे नाथाभाऊ पक्षाते एवढे मोठे नेते कसे वाया गेले असा प्रश्न महाजनांनी उपस्थिीत करत खिल्ली उडवली.
Eknath-Khadse-Girish-Mahajan
Eknath-Khadse-Girish-MahajanSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon Politics : नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्याकडून एकमेकांवर टीकेचे बाण सुटताना दिसत आहेत. आता गिरीश महाजन यांनी खडसेंवर बोचऱ्या शब्दात टीका केली आहे. दोघांमध्ये चांगलीच जुंपली आहे.

गिरीश महाजन यांच्या सारखा मी वाया गेलो नाही. गिरीश महाजन किती वाया गेला हे तुम्हाला माहिती आहे. कितीतरी ठिकाणी त्यांनी संबंध ठेवलेले आहेत. लोकांनाही ते माहिती आहे. संजय राऊत म्हणतात महाजन हा जामनेरचा सांड आहे. मी आता यावर बोलत नाही पण नंतर बोलेल असं सांगत खडसेंनी महाजन यांच्यावर टीका केली होती. आता एकनाथ खडसेंच्या टीकेवर गिरीश महाजनांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

गिरीश महाजन म्हणाले की, मी वाया गेलेला माणूस आहे असे खडसे म्हणाले. यावर मी काय बोलू? सध्या त्या माणसाला स्वतःचे चिन्ह काय आहे ते देखील समजत नाही. भुसावळ, रावेर, मुक्ताईनगरला ते वेगळे सांगतात. जिथे जातील तिथे वेगळे सांगतात. काय होता माणूस, काय झाला, कसा वाया गेला? संपूर्ण राज्यभरात आश्चर्य व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री पदाच्या रेसमधला माणूस असा काय वागतोय? आमच्या पक्षात तुमचा परिवार कसा घालतात, तुम्ही तुमचे काम करा ना असही महाजनांनी सुनावलं.

Eknath-Khadse-Girish-Mahajan
Eknath Khadse : 'भाजपचा प्रचार करा' एकनाथ खडसेंना शरद पवारांचा आदेश, संधी मिळताच मंगेश चव्हाणांनी काढला चिमटा

महाजन पुढे म्हणाले, माणूस राजकारणात दुर्बुद्धी सुचली की कुठून कुठे जातो याचे उदाहरण म्हणजे खडसे आहे. लोकसभेला सुनेचे काम करतो म्हटले आणि कमळ हाती घेतले. विधानसभेला तुतारी वाजवली. आता भुसावळला गेले तर म्हणतात घड्याळाला मतदान करा. कधी म्हणतात मशालीला मतदान करा. त्यांचा पक्ष कोणता हेच कळत नाहीत. त्यांना चिन्ह कोणते हे विचारा. तब्येत, वयोमानानुसार ते बोलताय असं टोला महाजनांनी लगावला.

Eknath-Khadse-Girish-Mahajan
Devendra Fadnavis : तपोवनातील जमीन मिळाली नाही तर हा कुंभमेळा होणार कसा? CM फडणवीसांचा महाजनांच्या सुरात सूर

एकनाथ खडसे यांचे अस्तित्व काही राहिले नाही. त्यांचे राजकारण संपले आहे. माणूस इतका कसा लाचार होऊ शकतो. सर्व पक्षाचे चिन्ह घेऊ शकतो. राजकारणात असा माणूस बघितला नाही. काय होतास तू, काय झालास तू, अरे येड्या कसा वाया गेलास तू अशी कविता करत गिरीश महाजनांनी खडसेंची खिल्ली उडवली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com