Honey trap Scandal: हनी ट्रॅप प्रकरणात आता राष्ट्रवादीची उडी, म्हणाले, प्रफुल्ल लोढा याची नार्को टेस्ट होऊन जाऊ द्या!

Jamner (Jalgaon) NCP leader Dilip Khodpe jumped into honey trap controversy-जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे यांनी केले सूचक वक्तव्य, प्रफुल्ल लोढा कोणाचा आरोग्यदूत, हे जामनेरला माहित आहे.
Girish Mahajan, Dilip Khodpe & Eknath Khadse
Girish Mahajan, Dilip Khodpe & Eknath KhadseSarkarnama
Published on
Updated on

Dilip Khodpe News: राज्यभर गाजत असलेल्या हनी ट्रॅप प्रकरणाची मुळे जामनेर शहरात आहेत. यासंदर्भात प्रफुल्ल लोढा या पूर्वाश्रमीच्या भाजपच्या नेत्याला अटक झाली आहे. त्यामुळे जामनेरचे राजकारण सध्या ढवळून निघाले आहे.

हनी ट्रॅप प्रकरणावरून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यात जोरदार आरोपाच्या फैरी सुरू आहेत. या निमित्ताने या दोन्ही नेत्यांतील राजकारण तापले आहे. अगदी एकेरीवर आणि कुटुंब पर्यंत त्याची धग बसू लागली आहे.

हनी ट्रॅप प्रकरणात आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी उडी घेतली आहे. पक्षाचे नेते दिलीप खोडपे यांनी याबाबत जलसंपदा मंत्री यांचे नाव न घेता त्यांना लक्ष्य केले. अनेक कार्यकर्ते कोणत्याही नेत्याबरोबर फोटो काढतात. फोटो काढल्याने नेत्याला दोष द्यावा, अशी स्थिती नसते.

Girish Mahajan, Dilip Khodpe & Eknath Khadse
Manikrao Kokate Politics: भास्कर जाधव यांचा गंभीर आरोप, माणिकराव कोकाटे यांनाच कृषी खाते नको असावे!

मात्र प्रफुल्ल लोढा हे प्रकरण एवढे साधे म्हणता येणार नाही. प्रफुल्ल लोढा हा कोणाचा आरोग्य दूध आहे, हे सबंध जामनेरला ठाऊक आहे, असे सूचक वक्तव्य श्री खोडपे यांनी केले आहे. खोडपे यांच्या या आरोपामुळे पुन्हा एकदा भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात राजकीय आरोप प्रत्यारोपास चालना मिळाली आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रफुल्ल लोढा याने कोणाचा प्रचार केला होता? निवडणुकीत तो कोणत्या पक्षासाठी आणि नेत्यासाठी भूमिका बजावत होता? हे जाहीर करावे. एकदाची लोढा यांची नार्को टेस्ट करा. म्हणजे सगळेच स्पष्ट होईल. दूध का दूध आणि पाणी का पाणी, अशी मागणी श्री खोडपे यांनी केली.

हनी ट्रॅप प्रकरणात राज्य शासन अचानक एवढे सक्रिय का झाले आहे?. लोढा याच्या विरोधात पोस्को आणि संबंधित गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राज्यात अनेक गंभीर मुद्दे आणि प्रश्न शिल्लक असताना, लोढा प्रकरणात राज्य सरकार आणि पोलीस एवढे सक्रिय का झाले? हे जनतेला माहित आहे, असेही खोडपे यांनी सांगितले.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com