Manoj jarange Patil: जरांगे पाटलांची ती भूमिका छगन भुजबळ यांच्या पथ्यावर?

Jarange Patil politics,The decision to give a candidate for assembly election is on the path of Chhagan Bhujbal-मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी स्वतंत्र उमेदवार देण्याची भूमिका छगन भुजबळ यांच्या पथ्यावर पडण्याचीच शक्यता आहे.
Manoj Jarange & Chhagan Bhujbal
Manoj Jarange & Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Bhujbal Vs Jarange patil: मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील येत्या २९ ऑगस्टला पुढील भूमिका जाहीर करणार आहे. त्यामुळे अनेक 'हौशे' उमेदवारीसाठी बाशिंग बांधून तयार झाले आहेत. यातील अनेकांनी जरांगे पाटील यांच्याशी संपर्क केला आहे.

मराठा आरक्षण शांतता रॅलीचा समारोप नाशिक येथे झाला. आता पुढील टप्प्यात २९ ऑगस्टला अंतरवेली सराटी येथे मेळावा होणार आहे. या मेळाव्यात आगामी विधानसभा निवडणुकीबाबत पुढील भूमिका ठरेल.

मनोज जरांगे पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत लढायचे की पाडायचे याचा निर्णय २९ ऑगस्टला घेणार असल्याचे जाहीर केले. या निर्णयामुळे प्रत्येक मतदारसंघात उमेदवार देण्याचा निर्णय होऊ शकतो. तसे झाल्यास येवला मतदारसंघात जरांगे पाटील यांचे प्रमुख टार्गेट असलेले ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यासाठी ते गिफ्ट ठरेल.

स्वतंत्र उमेदवार दिल्यास येवला मतदारसंघात प्रस्थापित असलेले भुजबळ यांना ते हवेच आहे. त्यामुळे भुजबळ समर्थकांना जरांगे पाटील यांच्या भूमिकेने मनातून आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत. दुसरीकडे सकल मराठा समाजाच्या गंभीर आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना चिंता सतावत आहे.

Manoj Jarange & Chhagan Bhujbal
Asif Shaikh Politics: असिफ शेख यांचा आरोप, रामगिरी महाराज यांच्या मागे भाजप!

येवला मतदारसंघात गेल्या चार निवडणुकांमध्ये श्री भुजबळ सरासरी ४५ ते ५५ हजारांच्या मताधिक्याने विजयी होत आले आहेत. श्री भुजबळ यांना सरासरी एक लाख मते मिळतात. त्यांच्या विरोधी उमेदवाराला ५० ते ६० हजार मते मिळतात.

या मतदारसंघातील अडीच लाख मतांमध्ये मराठा मतांची संख्या ९० हजार आहे. ही सर्व मते एक गठ्ठा एकाच उमेदवाराला मिळतील, अशी स्थिती नाही. मराठा समाजाचे अनेक नेते भुजबळ यांना मानतात.

अशा स्थितीत येवल्यातील उमेदवार कोण? हा देखील गंभीर विषय आहे. त्यावर गेल्या सहा महिन्यांपासून भुजबळ विरोधक मोर्चेबांधणी करीत आहेत. सध्या प्रमुख उमेदवार म्हणून भाजपच्या अमृता पवार यांच्या नावाची चर्चा आहे.

Manoj Jarange & Chhagan Bhujbal
Girish Mahajan Politics : नाशिकच्या दंगलीत खासगी पिस्तुलाचा वापर? चर्चेला फुटले तोंड...

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माणिकराव शिंदे, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख कुणाल दराडे, शिवा सुरवसे, जयदत्ता होळकर असे विविध उमेदवार आहेत. यातील कोणत्या उमेदवारावर एकमत होते, हे सांगणे अवघड आहे. येवला आणि लासलगाव परिसरातील सर्व उमेदवारांना एकत्र येऊन निर्णय घ्यावा लागेल.

यामध्ये मराठा आरक्षण हा एक प्रमुख विषय ठरणार आहे. विशेषतः लासलगाव आणि परस्परातील ४२ गावांमध्ये हा मुद्दा तापलेला आहे. येथील बहुतांश कार्यकर्ते श्री भुजबळ यांच्या विरोधात आक्रमक आहेत.

या परिस्थितीत सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन विविध पक्षांचे आणि समाजाचे समर्थन असलेला उमेदवार शोधणे हाच पर्याय आहे. असा उमेदवार मंत्री भुजबळ यांना पर्याय ठरू शकतो. सध्या मात्र जरांगे पाटील यांनी उमेदवार द्यावेत की नाही, हा विचार सुरू केला आहे.

सकल मराठा समाजाच्या आंदोलनात सहभाग कमी आणि मिरवून घेणारे अधिक असे कार्यकर्ते याकडे संधी म्हणून पहात आहेत. त्यातून जरांगे पाटील यांचा मूळ हेतू कितपत साध्य होईल, यावर सकल मराठा समाजाच्या नेत्यांमध्येही भिन्न मतप्रवाह आहे.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com