Maratha Reservation: जरांगे पाटील इफेक्ट... संभाजीराजेंच्या 'स्वराज्य'ची पहिली विकेट पडली

Jarange Patil`s first political effect on Sambhajiraje`s swarajy party-मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेने पारंपरिक राजकारण अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.
Manoj Jarange Patil & Chhatrapati Sambhajiraje
Manoj Jarange Patil & Chhatrapati SambhajirajeSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation Politics : मराठा आरक्षणाचे नवे नेतृत्व म्हणून पुढे आलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी या प्रश्नावर पारंपरिक राजकीय नेत्यांपेक्षा वेगळी भूमिका घेतली आहे. त्याचा परिणाम प्रस्थापित राजकीय पक्षावर होऊ लागला आहे. त्यामुळे अनेक राजकीय नेत्यांची अडचण होऊ लागली आहे. (Swarajya party`s spokesperson Karan Gaikar resignation from post

छत्रपती संभाजीराजे (Sambhajiraje) यांच्या स्वराज्य पक्षाचे संपर्कप्रमुख, प्रवक्ते करण गायकर (Maratha) यांनी आपल्या पदाचा राजीनामा (Nashik) दिला आहे. त्यांचा राजीनामा मंजूरदेखील करण्यात आला आहे.

Manoj Jarange Patil & Chhatrapati Sambhajiraje
Drug Mafia Lalit Patil : नाशिकच्या नेत्यांना ड्रग्ज प्रकरणातील आरोपींविषयी खरंच प्रेम आहे का?

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर नव्याने उदयास आलेले नेतृत्व असलेले मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षणावरील भूमिका वेगळी आहे. मराठा समाज कुणबी आहे. त्यामुळे या समाजाला सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन त्यांना आरक्षण द्यावे, ही त्यांची मागणी आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीविषयी सर्व पारंपरिक राजकीय पक्ष आणि प्रस्थापित नेत्यांच्या भूमिकेपेक्षा ती वेगळी आहे. सर्व राजकीय पक्ष मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे या मताचे आहेत. मात्र, जरांगे पाटील यांची भूमिका कुणबी म्हणजेच मराठा. त्यामुळे मराठा समाजाला कुणबी म्हणून त्याचा जेवढा वाटा आहे, तेवढे आरक्षण द्यावे, ही भूमिका आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांची कोंडी झाली आहे. विरोधही करता येत नाही, अन् समर्थनही करता येत नाही. अशा स्थितीत बहुतांश नेते जरांगे पाटील यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेऊन आहेत.

मनोज जरांगे पाटील यांचा नुकताच नाशिक दौरा झाला. त्यात बहुतांश आमदार, नेते सहभागी झाले. मात्र, व्यासपीठावर न जाता ते श्रोत्यांत बसले होते. या सर्व कार्यक्रमात स्वराज्य पक्षाचे संपर्कप्रमुख आणि प्रवक्ते करण गायकर हे मात्र दौऱ्यात सक्रिय होते. जरांगे पाटील यांच्याबरोबर ते होते. त्यानंतर काही दिवसांतच त्यांना पक्षाच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्यामुळे हा जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाचा इफेक्ट तर नाही ना?, अशी चर्चा सुरू झाली आहे.

Manoj Jarange Patil & Chhatrapati Sambhajiraje
Nawab Malik Bail : नवाब मलिकांना सर्वोच्च दिलासा; जामिनास मुदतवाढ, न्यायालयात नेमके काय झाले?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com