Dada Bhuse News : आधी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांचे आरोप आणि त्यापाठोपाठ ड्रग्ज प्रकरणातील फरार आरोपींसोबतच्या छायाचित्रांमुळे नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे टीकेचे लक्ष्य बनले आहेत. या प्रकरणात पोलिसांवरदेखील दबाव असल्याने भुसे या प्रकरणात अडकणार की निसटणार? याची चर्चा आहे. (Nashik Drug case now taken a political turn)
नाशिकमध्ये (Nashik) ‘एमडी’ ड्रग्जची फॅक्टरी मुंबई (Mumbai) पोलिसांनी (Police) सील केली. त्यानंतर नाशिकच्या पोलिसांची झोप उडाली. याबाबत पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांचा यातील आरोपींशी संबंध असल्याचा शिवसेनेने (Shivsena) थेट आरोप केला आहे.
ड्रग्जच्या या प्रकरणात आता थेट पालकमंत्री भुसे यांचेही नाव चर्चेत आल्याने खळबळ उडाली आहे. याविषयी मंत्री भुसे यांनी जबाबदारी झटकल्यावर त्यांची छायाचित्रेच माध्यमांतून झळकली. त्यामुळे त्यांची अवस्था बुडत्याचा पाय खोलात अशी होते की काय? अशी चर्चा रंगली आहे.
यापूर्वी वडाळा येथील अवैध व्यवसायाविरोधातील कारवाईमुळे शहरातील भाजपच्या एका महिला आमदाराचे नाव चर्चेत आले होते. या आमदारासह राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने ‘छोटी भाभी’ या टोपण नावाने चर्चेत असलेल्या आरोपीला सोडविण्यासाठी पोलिसांवर दबाव आणल्याच्या बातम्यांची शहरभर चर्चा होती.
गेल्या आठवड्यात आधी मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी शिंदे गावातील कारखान्यावर छापा टाकून तब्बल ३०० कोटींचा एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला. त्यापाठोपाठ नाशिक रोड पोलिसांनी शिंदे गावातच दुसऱ्या कारखान्यावर छापा टाकून सुमारे सहा लाखांचा एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला होता. याच दरम्यान अमली पदार्थविरोधी पथकाने वडाळागावात छापा टाकून दीड लाखाची एमडी पावडर जप्त केली होती.
या सर्व प्रकरणांत ‘एमडी’ ड्रग्जविरोधात तीन कारवाया केल्याने नाशिकचे नाव राष्ट्रीय पातळीवर झळकले. या गुन्ह्यांचा मुख्य सूत्रधार ललित व भूषण पाटील यांच्याशी संशयित कांबळे याचा संबंध असण्याची शक्यता आहे.
यातील काहींचा थेट पालकमंत्री तसेच इतर प्रकरणातील महिलेचा भाजपच्या आमदारांशी संबंध जोडला जात असल्याने सत्ताधारी पक्षाच्या नाशिकच्या नेत्यांना गुन्हेगारांविषयी एवढे प्रेम का? ही सामान्य नागरिकांत चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.