NCP Ambadas Khaire: नाशिकच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्षांची 'ही' मागणी अन् बिअर फॅक्टरी लॉबी हादरली

Jayakwadi Water Issue : "मराठवाड्यातील बिअर फॅक्टरी बंद झाल्यानंतरच नाशिकचे पाणी जायकवाडीला द्यावे..."
Ambadas Khaire
Ambadas KhaireSarkarnama
Published on
Updated on

Nashik News: जायकवाडी धरणात पाणी सोडण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून चांगलंच राजकारण तापलं आहे. मराठवाड्याला नगर आणि नाशिक जिल्ह्यांतील धरणातून पाणी सोडण्याची मागणी आहे. पण जायकवाडीला पाणी देण्यास नगर आणि नाशिक जिल्ह्यांतील नेत्यांनी विरोध दर्शवला. आता यातच नाशिक शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी दिलेल्याने निवेदनाची सध्या मोठी चर्चा रंगली आहे.

मराठवाड्यातील बिअर फॅक्टरी बंद झाल्यानंतरच नाशिकचे पाणी जायकवाडीला द्यावे, अशा मागणीचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना दिले आहे. अंबादास खैरे यांच्या या मागणीमुळे आता नवीन वादाला तोंड फुटले असून, बिअर फॅक्टरी चालकांची लॉबी पडद्याआडून अधिकच आक्रमक होणार असल्याचे चित्र आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ambadas Khaire
Jayakwadi Water Issue: सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; जायकवाडीला उत्तर महाराष्ट्रातील धरणातून पाणी सोडलं जाणार

अंबादास खैरे म्हणाले, "नगर-नाशिकमध्ये यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली. धरणातील पाणीसाठा मुबलक प्रमाणात नसल्याने नाशिक जिल्ह्यातील नांदगाव, येवला आणि सिन्नरसारखे तालुके दुष्काळग्रस्त झाले. नाशिकमधील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढताना पाण्याची मागणीसुद्धा वाढताना दिसत आहे. गंगापूर धरणातील पाणीसाठा नाशिककरांकरिता अपुरा पडत आहे. कश्यपि, गौतमी या धरणांतील पाण्यावर गरज भागवावी लागत आहे. यात जायकवाडीला पाणी सोडण्याचा हा नाशिककरांच्या तोंडचे पाणी पळवण्यासारखे होईल", असेही खैरे यांनी म्हटले आहे.

"नाशिक शहरातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना शेतीकरिता मुबलक पाणी नसल्याने एक-दोन महिन्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. सद्यःस्थितीत नाशिकमधील शेतकऱ्यांना शेतीकरिता पाणी उपलब्ध होत नाही. अशात गंगापूर धरणातील पाणी सोडल्यास उन्हाळ्यात नाशिककरांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल. नाशिक जिल्ह्यातील अनेक गावांत सद्यःस्थितीत टँकरने पाणीपुरवठा होत आहे."

"मराठवाड्यात जायकवाडी धरणातील पाण्याचे नियोजन नसल्याने नाशिक-नगरमधील 8.6 टीएमसी पाण्याचा पुरेपूर फायदा छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील वाळुंज, शेंद्रा, चिकलठाणा, डीएमआयसी करमाड व बिडकीन या औद्योगिक वसाहतींतील बिअर फॅक्टऱ्या व मोठ्या कंपन्यांना होणार आहे. त्यामुळे मराठवाड्यातील बिअर फॅक्टऱ्या बंद करून जायकवाडी धरणातील पाण्याचे सूक्ष्म नियोजन केल्यावरच नाशिकचे पाणी जायकवाडीमध्ये सोडण्याचा विचार करावा," असे अंबादास खैरे यांनी निवेदनात म्हटले आहे.

(Edited By - Ganesh Thombare)

Ambadas Khaire
Milk Price News : दुधाच्या दरात वाढ होणार ? मंत्री राधाकृष्ण विखेंनी बोलावली तातडीची बैठक

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com