Milk Price News : दुधाच्या दरात वाढ होणार ? मंत्री राधाकृष्ण विखेंनी बोलावली तातडीची बैठक

Radhakrishna Vikhe Patil News : दूध उत्पादक शेतकरी अडचणीत, राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे बैठकीकडे लक्ष
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil Sarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : सरकारच्या दुग्ध व्यवसाय विभागाकडून दुधाच्या किमान दराबाबत अध्यादेश असतानाही खासगीसह शासकीय दूध संकलन संस्थांनी या आदेशाला हरताळ फासत किमान दर दिलेला नाही. यामुळे एकूणच राज्यातील दूध उत्पादक संतप्त असून, शेतकऱ्यांचे नेतृत्व करणाऱ्या संघटना आंदोलने करत आहेत.

याच अनुषंगाने आज राज्याचे दुग्ध विकासमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत रयत क्रांती मोर्चाचे अध्यक्ष, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि खासगी, शासकीय दूध संस्थांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत बैठक होत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Radhakrishna Vikhe Patil
Dhangar Reservation : धनगर आरक्षणावर आज तोडगा निघणार? राम शिंदे पुन्हा आंदोलकांना भेटणार

या बैठकीत दोन्ही बाजूंची मते जाणून घेत सरकार दूधदराबाबत निर्णय घेणार आहे. नगरमध्ये रयत क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसोबत गेल्याच आठवड्यात राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठक घेत दूध दराच्या प्रश्नांवर सरकार गंभीर असून, लवकरच यावर मुंबईत बैठक घेऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने निर्णय घेतला जाईल, तसेच सरकार आदेश न पाळणाऱ्या खासगी संस्थांबाबत कठोर धोरण घेईल, असे आश्वासन दिले होते.

सदाभाऊ खोत यांनी दिला होता इशारा

माजी मंत्री आणि रयत क्रांती मोर्चाचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी दिवाळी पाडव्याच्या दिवशी दुग्ध विकासमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या लोणी येथील निवासस्थानासमोर खर्डा-भाकरी खाऊन आंदोलनाचा इशारा दिला होता.

मात्र, यात विखे यांनी सदाभाऊ खोत यांना आंदोलन न करण्याचे आवाहन करत नगरमध्ये बैठक लावली होती. या बैठकीत ठरल्याप्रमाणे आज मंगळवारी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

दूधदरासंदर्भात काय आहेत मागण्या ?

  • गाईच्या दुधाला 45 रुपयांपेक्षा जास्त दर मिळाला पाहिजे.

  • पशुखाद्यावर सरकारचे नियंत्रण आणले पाहिजे.

  • पशुखाद्याचे दर 50 टक्के कमी करण्यात यावेत.

  • दूध भेसळीसह विरोधात कारवाईचे पथके तयार करण्यात यावीत.

  • जनावरांचा विमा कवच योजना उपलब्ध करावे.

  • दूधदर मूल्य आयोग स्थापन व्हावेत, कायदेशीर मान्यता मिळावी.

  • दुधाला F.R.P. कायदेशीर कवच मिळावे.

  • प्रत्येक गावामध्ये पशुवैद्यकीय डॉक्टर व लॅब उपलब्ध करावेत.

(Edited By - Ganesh Thombare)

Radhakrishna Vikhe Patil
Dhangar Reservation : धनगर आरक्षणावर आज तोडगा निघणार? राम शिंदे पुन्हा आंदोलकांना भेटणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com