Sujay Vikhe : 'शिजायला लागलं की, पातेल्याला लाथ.., लोकसभेपासून ग्रहमान काही ठीक नाही'; सुजय विखे यांचे विधान

Former BJP MP Sujay Vikhe who was active in campaigning for Mahayuti candidates expressed his regret : अहिल्यानगर जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी त्यांच्या नशीबाविषयी केलेले विधान चर्चेत आले आहे.
Sujay Vikhe
Sujay VikheSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar News : लोकसभेतील निवडणुकीच्या पराभवानंतर विधानसभेसाठी संगमेनर मतदार संघातून इच्छुक असलेले माजी खासदार सुजय विखे यांनी मनातील खंत व्यक्त केली.

सुजय विखे जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय आहे. त्यांनी जिल्ह्यात सभांचा धडाका लावलाय. यातून ते लोकसभेची तयारी करत असल्याचे सांगितले जात आहे. परंतु या प्रचार सभामधून त्यांनी मनातील एक खंत बोलवून दाखवली आहे. त्यांची ही खंत आणि त्याविषयी व्यक्त केलेले विधान चर्चेत आले आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीचा वातावरण चांगलेच तापले आहे. रणधुमाळी शिगेला पोचली आहे. विविध मतदारसंघात दिग्गज नेत्यांचा एकमेकांविरोधात सभांचा धडाका सुरू आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर विधानसभा मतदारसंघ गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी माजी खासदार सुजय विखे यांनी केली होती. तशी पक्षश्रेष्ठींकडे तिकिटाची मागणी केली होती. परंतु हा मतदारसंघ एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेला सुटला.

Sujay Vikhe
Pankaja Munde : सुजय विखेंसह लोकसभेतील पराभवावर मुंडेंनी सोडलं मौन; विरोधकांच्या अफवांवर बरसल्या

सुजय विखे यांचा लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी विधानसभा निवडणूक लढण्याची तयारीची चर्चा जिल्ह्याती होती. संगमनेर मतदारसंघ त्यांनी निवडला होता. त्यासाठी त्यांनी तयारी देखील सुरू केली होती. यातून बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि विखे आमने-सामने आले होते. शिवसेना ही जागा लढवत असली, तरी दोन्ही कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागल्याची पाहयला मिळत आहे.

Sujay Vikhe
Jyotiraditya Scindia: 'महायुती सरकार आणा अन् योजनांचा हप्ता वाढवून घ्या'; ज्योतिरादित्य सिंधियाकडून 'मविआ'चा महाविनाश, असा उल्लेख

सुजय विखे विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या प्रचारात सक्रिय आहे. प्रचारसभांचा त्यांनी जिल्ह्यात धडाका लावला आहे. यातून ते लोकसभेची पेरणी करायला सुरवात केली आहे. तसे ते बोलून दाखवत आहे. परंतु ते गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याभोवती सुरू असलेल्या घटनाक्रमांवर देखील ते भाष्य केले आहे. त्यांचे हे विधान चर्चेत आले आहे.

विखेंच्या विधानाचा नेते देखील संभ्रमात

"माझ्या नशीबात सध्या गडबड सुरू आहे. माझं काही शिजायला लागलं की, लगेच कुणीतरी पातेल्याला लाथ मारतं. लोकसभा निवडणुकीपासून माझे ग्रहमान काही ठीक नाहीत" असे सुजय विखे यांनी म्हटले आहे. सुजय विखे परखड मतं मांडणारे नेते आहे. त्यांच्या या विधानाचा नेते अर्थ काढण्यात गुंतले आहेत. तशी चर्चा देखील सुरू झाली आहे.

संगमनेरमध्ये ठरलं आणि जुळलं होतं...

"लोकसभा निवडणुकीत मार्चपर्यंत सुरळीत सुरू होते. परंतु एप्रिलमध्ये गडबड व्हायला सुरवात झाली. ती काय गडबड झाली माहिती नाही. खासदारकी गेली मग आमदार होऊ, असे वाटले. संगमनेरला गेलो. तिथं चार सभा घेतल्या. सुजय विखेच आमदार होणार, असे लोक म्हणू लागले. तेवढ्यात तिथं शिजलेल्या पातेल्याला लाथ मारली गोली. आता मी त्या गोष्टी वेळेवर करेल", असेही सुजय विखे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com