Jayant Patil : साम्राज्याच्या विस्तारासाठी गुंडांची मदत; मुख्यमंत्र्यांवर जयंत पाटलांचा प्रहार

CM Eknath Shinde : गुंड नीलेश घायवळसोबतच्या फोटोवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर पुन्हा टीकेचा घणाघात
Eknath Shinde, Jayant Patil
Eknath Shinde, Jayant PatilSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar Political News :

'महाराष्ट्रात गुंडाराज' अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काल (6 फेब्रुवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केली होती. त्यावरून काल दिवसभर मुख्यमंत्री शिंदे टीकेच्या निशाण्यावर होते. त्यावरून आज राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकेचा प्रहार केला.

राजकारणातील लोक गुंडांच्या मदतीने आपल्या साम्राज्याचा विस्तार करत आहेत, अशी घणाघाती टीका जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर (Eknath Shinde) केली आहे.

अधोगतीकडे नेणारे 'छायाचित्र'

मुख्यमंत्री आणि त्यांचे पुत्राचे गुंडांसोबतचे छायाचित्र हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे. हे चित्र महाराष्ट्र अधोगतीकडे नेणारे उदाहरण आहे. गुंडगिरी करणारे राजकारणात आलेत. राजकारणातील लोक गुंडांच्या मदतीने त्यांच्या साम्राज्याचा विस्तार करताना दिसत आहेत. असे दोन्ही कॉम्बिनेशन सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळत आहेत, अशी टीका जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली आहे.

राष्ट्रवादी आणि निवडणूक आयोग

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) लोकशाही पद्धतीने निवड झालेल्या वाटत नाहीत, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने निकालात म्हटले आहे. यावर जयंत पाटील यांनी आक्रमक पद्धतीने उत्तर दिले. ते म्हणाले, राष्ट्रवादी पक्ष हा कधीच एका कुटुंबाचा पक्ष होता, असे झालेले नाही. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापन केली. महाराष्ट्रात पक्षाचा अध्यक्ष पवार यांच्या कुटुंबातील कधीच नव्हता. या पक्षात देशातील विविध राज्यातील पदाधिकारी, राज्याध्यक्ष राहिले आहेत, याकडे जयंत पाटील यांनी लक्ष वेधले.

चूक कुणाची?

आमची कुठेही चूक झालेली नाही. चूक ही निर्णय देणाऱ्याची झाली आहे. या निर्णयाविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत, असे सांगत जयंत पाटील यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालावर बोट ठेवले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मी आल्याचे कळाले, हे खूप झाले..!

माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी जयंत पाटील यांच्या स्वागताचे फलक नगर शहरात लावले होते. या फलकांवर राष्ट्रवादी पक्ष आणि पक्षचिन्ह होते. निकाल येण्यापूर्वी हे फलक लावले होते. निकालानंतर अजित पवार गटाच्या नगरमधील कार्यकर्त्यांनी हे फलक मंगळवारी रात्री हटवले.

हे फलक हटवताना राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार गटाच्या नगरमधील कार्यकर्त्यांना फौजदारी कारवाईचा इशारा दिला आहे. यावर जयंत पाटील यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मी शहरात आलेलो आहे हे त्यांना कळले आहे, हेच त्यांच्यासाठी खूप झाले.

(Edited by Avinash Chandane)

Eknath Shinde, Jayant Patil
Yashomati Thakur : 'म्हातारपणी बापाला लाथ का मारावीशी वाटली?' निवडणूक आयोगाच्या निकालानंतर यशोमती ठाकूर बरसल्या

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com