Yashomati Thakur : 'म्हातारपणी बापाला लाथ का मारावीशी वाटली?' निवडणूक आयोगाच्या निकालानंतर यशोमती ठाकूर बरसल्या

ECI verdict on NCP : सगळं काही अपेक्षित होतं, यशोमती ठाकूर यांनी उद्विग्न प्रतिक्रिया
Sharad Pawar, Yashomati Thakur, Ajit Pawar
Sharad Pawar, Yashomati Thakur, Ajit PawarSarkarnama

Amravati Political News :

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची हा मोठा निर्णय काल (6 फेब्रुवारी) केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला. त्यानंतर देशभरातून यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. विशेष म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाने जो निकाल शिवसेनेबाबत देण्यात तसाच निकाल राष्ट्रवादी काँग्रेसबाबत दिला आहे. यावर काँग्रेसच्या नेत्या आणि आमदार यशोमती ठाकूर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

Sharad Pawar, Yashomati Thakur, Ajit Pawar
Sharad Pawar News: चिन्ह जाऊ दे ! आमचा नेता भक्कम आहे!

राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची यावर काही महिन्यांपासून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे (ECI) वाद सुरू होता. 2 जुलै 2023 अजित पवारांनी (Ajit Pawar) उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एन्ट्री घेतली. तेव्हापासून राष्ट्रवादी कुणाची, हा वाद चिघळला होता. त्यावर काल केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल दिला.

यावरून काँग्रेसच्या आमदार आणि नेत्या यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. हे अपेक्षित होतं की हे पुन्हा असंविधानिकरित्या वागणार आहेत. या सगळ्या गोष्टी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) गेल्या पाहिजेत, असंही त्या म्हणाल्या.

जो बाप सांभाळू शकत नाही...

अजितदादा तिकडे का गेले? त्यांना म्हातारपणी बापाला लाथ का बरं मारावीशी वाटली? जी व्यक्ती स्वतःच्या बापाला म्हातारपणी लाथ मारते, ती व्यक्ती जनतेचं काय भलं करणार? जो स्वतःचा बाप सांभाळू शकत नाही तो जनता कशी सांभाळेल, या शब्दांत यशोमती ठाकूर यांनी या निकालाचा आणि अजित पवारांच्या विजयाचा समाचार घेतला. त्याचवेळी अजित पवारांना तिकडे का जावंसं वाटलं, त्यांची काय मजबुरी होती, असे सवालही त्यांनी उपस्थित केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, चंडिगडच्या निकालात सरन्यायाधीशांनी त्यांना चांगलेच झापले होते आणि हा लोकशाहीचा खून, लोकशाहीच्या विरोधात असल्याचे म्हणले होते. आताही तसेच झाले आहे, याकडे यशोमती ठाकूर यांनी लक्ष वेधले आहे.

महाराष्ट्राच्या चारित्र्याला डाग...

काही लोक महाराष्ट्राच्या चारित्र्याला डाग लावण्याचेच का करत आहेत. महाराष्ट्रात जे काही सुरू आहे ते अशोभनीय आहे, अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली. त्याचवेळी येणाऱ्या काळात महाराष्ट्राची जनता या सर्वांना सडेतोड उत्तर देईल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

(Edited by Avinash Chandane)

Sharad Pawar, Yashomati Thakur, Ajit Pawar
Ulhas Bapat on NCP : घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं निवडणूक आयोगाच्या निकालावर मोठं वक्तव्य; आता सुप्रीम कोर्टानं...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com