NCP Sharad Pawar news: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नाशिक जिल्हा पदाधिकाऱ्यांत खांदेपालट करण्यात आली आहे. पक्षाने नवा जिल्हाध्यक्ष नियुक्त केला आहे. नव्या जिल्हा अध्यक्षांपुढे पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराचे मोठे आव्हान असेल.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी नव्या नियुक्त्या केल्या. यामध्ये जिल्हाध्यक्षपदी दत्तात्रय पाटील यांची नियुक्ती झाली. विद्यमान जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांना प्रदेश उपाध्यक्षपदी पदोन्नती देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला विधानसभा निवडणुकीत मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. जिल्ह्यात पक्षाचे सर्व सहा आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेले होते. या सर्व आमदारांना अजित पवार पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली. हे सर्व सहा आमदार विजयी झाले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नाशिक जिल्ह्यात पाच मतदारसंघात उमेदवार दिले होते. या सर्व उमेदवारांचा पराभव झाला. त्यामुळे पक्षाच्या संघटनात्मक आणि राजकीय विस्तारासाठी नवे प्रयत्न करण्याची आवश्यकता होती. या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती करण्यात आली आहे.
युक्ती होताच श्री पाटील यांनी कामकाजाला सुरुवात केल्याचे सांगितले. जिल्ह्यातील पश्चिम वाहिन्या नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविणे हा प्राधान्यक्रम आहे. सरकारच्या धोरणामुळे कांद्याचे दर सातत्याने कोसळत आहेत. कमी होऊनही शेतकऱ्यांना कोणताही लाभ होऊ शकलेला नाही. त्यासाठी भाजप सरकार विरोधात पाठपुरावा करू, असे पाटील म्हणाले.
राज्यात सत्तेत आलेल्या महायुती सरकारने अतिशय उत्साहाने निवडणुकीत अनेक घोषणा केल्या. या घोषणेतून मतदारांची दिशाभूल करण्यात यशस्वी झाले. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने केली होती. सत्तेत आल्यावर मात्र त्यांनी कर्जमाफी देण्यास सपशेल नकार दिला आहे.
आगामी काळात नाशिक जिल्ह्यात शेतकरी कर्जमाफीसाठी शासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल. सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न आणि औद्योगिक वसाहतींमध्ये युवकांना रोजगार याबाबत ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. त्यासाठी सरकारला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष भाग पाडेल, असा विश्वास श्री पाटील यांनी व्यक्त केला.
पक्षाचे मावळते जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांच्या कुटुंबात काही दिवसांपूर्वी दुःखद घटना घडली होती. त्यामुळे श्री आव्हाड यांनी पक्षाकडे पदमुक्त होण्यासाठी विनंती केली होती. आता श्री आव्हाड यांना प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे.
------
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.