नाशिक : जायकवाडी प्रकल्पाच्या (Jayakwadi ID Project) खालच्या बाजुला सिंचनात येणारी तुट व अडचणी आता सुटण्याची आशा निर्माण झाली आहे. काल झालेल्या जलसंपदा विभागाच्या बैठकीत या भागासाठी शासनाने १९.२९ टीएमसी (19.29 TMC) अतिरीक्त पाणी उपलब्ध करण्यात आल्याने महाविकास आघाडीने (Mahavikas Front Government) मराठवाड्याला (Relief for Marathwada) दिलासा दिला आहे.
यंदा गुलाब वादळ तसेच अन्य वादळामुळे शेवटच्या टप्प्यात अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. या पावसाने सुरवातीच्या काळातील तुट भरून निघाली. बहुतांश पाटबंधारे प्रकल्पांतील साठ्यात लक्षणीय वाढ झाली. त्याचा लाभ सिंचनासाठी पाण्याची अडचण निर्माण होणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाच्या खालच्या भागाला होणार आहे. यानिमित्ताने महाविकास आघाडी सरकारकडून मध्य गोदावरी खोऱ्यातील मराठवाड्याच्या पिरसराला पाणीदार गिफ्ट मिळाल्याने शेतीला दिलासा मिळाला आहे.
गुरुवारी याबाबत मंत्रालयात जलसंपा विभागाची बैठक जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झाली. त्यासंदर्भात श्री. पाटील यांनी ट्वीट करून त्याची माहिती दिली.
ते म्हणातात, मध्य गोदावरी उपखोऱ्यातील १९.२९ टीएमसी अतिरिक्त पाणी वापरास मान्यता दिली आहे. गोदावरी पाणी तंटा लवादातील तरतुदीनुसार ६ ऑक्टोबर १९७५ पूर्वीच्या प्रकल्पांतील पाणी वापर संरक्षित असून त्यानुसार ६० टीएमसी पाणी वापरास मान्यता आहे. पूर्वीच्या मंजूर पाणी वापरात काही त्रुटी होत्या. त्या त्रुटी महाविकास आघाडी शासनाच्या जलसंपदा विभागाने दूर केल्या आहेत. यामुळे आता मध्ये गोदावरी उपखोऱ्यात ६० टीएमसी आणि ६१.२९ टीएमसी असे १२१.२९ टीएमसी पाणी वापराचे नियोजन शक्य आहे. हे लक्षात घेत १९.२९ टीएमसी अतिरिक्त पाणी वापरास मान्यता दिली आहे.
उपरोक्त अनुज्ञेय अतिरिक्त पाण्याच्या वापराचे नियोजन लेंडी, लोणीसावंगी, सिद्धेश्र्वर व निम्न दुधना या प्रक्लपांच्या खालील भागासाठी हे पाणी उपलब्ध करण्यात येणार आहे. अर्थात त्यात नवे बंधारे बांधता येणार नाही व त्याबाबत यापूर्वीचे निर्देश कायम राहतील. तरीही जादा पाणी मिळाल्याने मराठवाड्याला मोठा दिलासा मिळणार आहे.
...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.