Thackeray-Shinde Politics : सावधान गद्दारांनो ..! दिग्रसमध्ये लावलेल्या बॅनर्समधून गवळी, राठोडांना इशारा

Maharashtra Politics : पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांचा आज (ता. ९) दौरा विदर्भ दौरा आहे. पोहरा देवी दर्शन व दिग्रस येथे सभाही होणार आहे
Thackeray-Shinde Politics :
Thackeray-Shinde Politics : Sarkarnama
Published on
Updated on

Uddhav Thackeray Vidarbha Visit : पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांचा आज (ता. ९) दौरा विदर्भ दौरा आहे. पोहरा देवी दर्शन व दिग्रस येथे सभाही होणार आहे. या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. उध्दव ठाकरे यांच्या समर्थनार्थ दिग्रसमध्ये बॅनरबाजी करत बंडखोर आमदारांना एक प्रकारे इशाराच देण्यात आला आहे. "सावधान गद्दारांनो तुमचा बाप दिग्रसला येतोय," अशा आशयाचे बॅनर्स लावून उध्दव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी गद्दारांना इशाराच दिला आहे.

माजी आमदार बाळासाहेब मुनगीनवार यांचे आर्णीत झळकलले फलक राजकीय वर्तुळात चर्चा विषय ठरला आहे. शिवसेना पक्षात बंडखोरी झाली होती. एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस आमदारांनी बंड केल्याने महाराष्ट्रातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकार कोसळलं. एवढ्या मोठ्या संख्येनं आमदारांनी केलेल्या बंडामुळे महाराष्ट्राचं राजकीय वातावरण ढवळून निघाले होते.

Thackeray-Shinde Politics :
Sharad Pawar Yeola Meeting: पवारांची किमया; येवल्याच्या इतिहासात प्रथमच चारही नेते एकाच मंचावर

या घटनेला आता वर्षाहून अधिकचा कालवधी लोटला आहे. पण या घटनेतील बंडखोरांना आजही गद्दार म्हणून संबोधले जात आहे. अशातच दिग्रसमधील आर्णी येथील तहसील कार्यालयासमोर उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी हे बॅनर्स लावण्यात आले आहेत. 'सावधान गद्दारांनो तुमचा बाप दिग्रसला येतोय,' असा मजकूर या बॅनर्सवर लिहिण्यात आला आहे. विशेष म्हणजे माजी आमदार बाळासाहेब मूनगीनवार यांचाही फोटो या बॅनरवर दिसत आहे.

माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे पक्षात बंडखोरी झाल्यानंतर प्रथमच यवतमाळ जिल्ह्यात येत आहे. पोहरादेवी येथे दर्शन घेऊन पालकमंत्री संजय राठोड यांच्या मतदारसंघात बाल्लेकिल्ला असलेत्या दिग्रस येथे सभा घेणार आहेत.

ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचा जोश वाढलेला असून सावधान गद्दारांनो तुमचा बाप दिग्रसला येतोय, असा मजकूर लिहिलेले फलक आर्णीत लावून माजी आमदार बाळासाहेब मूनगीनवार यांनी बॅनरच्या माध्यमातून खासदार भावना गवळी व यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांना एक प्रकारे इशारा दिला आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com