

Manoj Jarange: मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आज आंतरवाली सराटीत महत्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी ईडीच्या कारवयांवरुन अत्यंत खळबळजनक आरोप केले आहेत. यासाठी त्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर आरोप केले असून एकेरी भाषेत त्यांचा उल्लेख करत आगपाखडही केली. पण या नव्या आरोपांमुळं आंतरवालीत नेमकं काय सुरु आहे? जाणून घेऊयात.
जरांगे उपोषणस्थळावरुन बोलताना म्हणाले की, "फडणवीसांना थोडा थोडा नाड आहे. त्यांनी काय केलंय? तर यापूर्वीची परिस्थिती वेगळी होती, पण मला आता शंका यायला लागली आहे की, यामागं फडणवीसच आहेत. कारण त्यांनी माझ्या आजुबाजुच्या जवळच्या लोकांना ईडीच्या नोटीस द्यायला लावल्या आहेत. ईडीला एक स्टेटस आहे, ते सिंबॉलिक आहे. आंतरवालीतल्या लोकांची ईडीची चौकशी केली तर त्या ईडीची किंमत काय राहिली? देशातले आणि जगातले टपोरी टपोरी सोडून दिले आणि आंतवालीत आहे काय? त्यांना घरात फरशी टाकता येईना, त्यांच्या ईडीच्या चौकशा करता. यामुळं ईडीला किंमत राहील का? त्यापेक्षा मीच हे काम करतो त्यांना ट्रकमध्ये भरतो आणि ईडीकडं जाऊन सोडतो, पुण्याला. काय नीचपणा? आहे हा.
माझ्यासोबत काम करतात म्हणून फडणवीसांना कोणातरी हाताखाली धरायचं आणि आंदोलनाला सपोर्ट करु नये म्हणून त्यांना ईडीच्या नोटीसा फडणवीसांनी द्यायला लावायच्या इतका नीचपणा? एक दोन असता तर ठीक आहे. माझ्या आजुबाजुच्या सगळ्यांना? याचा अर्थ मराठ्यांनी ध्यानात ठेवा, याचा अर्थ आंदोलन बंद पडलं पाहिजे याचा अर्थ हा आहे. मला साथ देणाऱ्यांना गार करायचं आणि आंदोलन बंद पडलं पाहिजे याचा अर्थ हा होतो. तुम्हाला सर्वांना यांच्या पाठिशी उभं राहावं लागले.
त्यांनी आजच पदाला लाथ मारली आहे, आणि ते पण म्हणत आहेत की आमच्याजवळ काहीही नाही. आम्ही तुरुंगात जायला तयार आहोत, त्यामुळं ते माझ्यासोबत बसलेच नसते आत बसले असते. परवाच ते माझ्याकडं आले म्हणाले आम्ही जेलमध्ये जाऊन बसायला तयार आहोत. आमच्याकडं हिशोब आहे, पुर्ण हिशोब आहे. पूर्ण हिशोब दिला तर काहीही अडचण नाही. पण हे इतके अपऱ्या बुद्धीचे आहेत की, हे कोणाचा गुन्हा नसला तरी त्यांना जेलमध्ये टाकतात. यामध्ये ते गेल्यानंतर का लोक जेलमध्ये जात नाहीत.
आता माझ्यासोबत १०,००० लोक काम करणार आहेत राज्यात. आता यांची नावं दिलीत आंदोलन बंद पाडण्यासाठी माझ्या जवळचे आहेत म्हणून. फडणवीसांनी पक्षात पण असेच केलेत. आता याचं खऱ्याच खोटं आणि खोट्याचं खरं करु शकतो. पण आता हे लक्षात ठेवा, आता तुमचे पण पावणे असतील त्यांनाही ईडीच्या नोटीसा जाणार आहेत. आमचे देखील पोरं आता तक्रारी करणार आहेत. यांच्या चौकशा करणार आणि आम्ही दिलेल्या अर्जाच्या चौकशा होणार नाहीत का? यामध्ये नेता असेल, नोकरीला असेलच ना कोणीतरी? कोणीतरी सापडलेच. तुमच्या पाहुण्यांना त्रास झाल्यावर मग कळेलं कसं होतं ते, असा इशारा यावेळी जरांगेंनी मुख्यमंत्र्यांना दिला.
आंतरवालीतच शाळा, दारु नाही सगळ्या जिल्ह्यात दारु आहे. आंतरावालीचाच स्वतंत्र कलेक्टर आहे का? जालना जिल्ह्याचा वेगळा आहे का? बावनकुळे तुम्ही कलेक्टरला लक्ष ठेवण्याचं काम दिलंय का? माझ्याशी खेटायच नाही बावनकुळे आणि भुजबळांनी. भुजबळ म्हणाले होते की, जिल्हाधिकारी नर्व्हस झाल्या होत्या. पण आम्ही त्यांची इज्जत केलीए, कलेक्टर महिला होत्या म्हणून, त्यांना मी ताईशिवाय बोललो नाही. कलेक्टर मॅडम नर्व्हस झाल्याचं छगन भुजबळांना काय माहिती?
बावनकुळेंना सांगतो की त्यांनी बदला घ्यायच्या भानगडीत पडू नये. कलेक्टरला पुढे घालून काम करु नका. त्या महिला आहेत म्हणून मी बोलत नाही, इज्जतीनं बोलतोय. इथं त्या तिन वेळेस आल्या या तिन्ही वेळेस मी त्यांना इज्जत दिली. कलेक्टरला माझ्या अंगावर घालू नका मी चांगल्या चांगल्या नेत्याची आणि अधिकाऱ्याची जिरवली आहे. बावनकुळे आणि भुजबळांमुळं जर कलेक्टरकडून आम्हाला त्रास झाला तर बावनकुळेंना सांगतो की, कलेक्टरला फासा टाकला तर मराठ्यांचा हा फासा निघणार नाही. माझ्या नादी लागायचं नाही, मी त्यांची इज्जत करतोय.
कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल? याची १५ दिवस झाले प्रयत्न सुरु आहे. बावनकुळेंचं ऐकून. प्रसाद लाड यांनाही सांगतो की, बावनकुळेंना सांगा की कलेक्टरला आमच्या अंगावर घालू नका आंदोलन मोडायसाठी. बावनकुळे हे जालन्याच्या कलेक्टरचा गैरवापर करत आहेत. बावनकुळेंचं ऐकून तुम्ही जातीयवाद करु नका. तुम्हाला हे जड जाईल. या जिल्ह्यात तुमचा सन्मान होईल असं वागा, असंही मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
जनता ही नेत्याला आणि अधिकाऱ्यांना आपली अडचण सोडवण्यासाठी बोलवतच असते, इथं लिंग भेद नसतो, अधिकाऱ्यांमध्ये, राजकारण्यांमध्ये, मंत्र्यांमध्ये लिंगभेद नसतो. महिला मंत्री झालेल्या आहेत पण त्यांनाही शिव्या खाव्या लागतात. त्यामुळं तुम्ही कलेक्टर आहात तर इथं लिंगभेदाचा संबंध काय? तुम्ही म्हणाल मी महिला आहे तर तुम्ही माझ्याकडं यायचं नाही ते चालणार नाही. पत्रकारांनाही मुख्यमंत्र्यांनी सांगायचं काम नाही. पत्रकार परिषदेत कलेक्टर सांगतात मराठ्यांना आम्ही सगळं दिलं आता देऊ शकत नाही. पण हे सांगायचं कलेक्टरचं काम नाही मुख्यमंत्र्याचं काम आहे? असा सवालही जरांगेंनी यावेळी पोलिसांना केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.