Kalpana Chumbhale Politics: पदभार स्वीकारताच सभापती कल्पना चुंबळे यांनी सुरू केली पिंगळे यांची नाकाबंदी?

Kalpana Chumbhale; newly elected BJP Kalpana chumbhale stopped Devidas Pingle's APMC projects-माजी सभापती देविदास पिंगळे यांनी मंजुरी दिलेला खत प्रकल्प रद्द चुंभळे यांच्याक़ून रद्द केल्या
Kalpna Chumbhale & Devidas Pingle
Kalpna Chumbhale & Devidas PingleSarkarnama
Published on
Updated on

Kalpana chumbhale News: भाजपच्या कल्पना चुंभळे त्यांनी नाशिक बाजार समितीचे सभापती होताच आपल्या राजकारणाची चुणूक दाखवली आहे. नव्या सभापतींनी मावळत्या सभापतींना गंभीर इशारा दिला. त्यामुळे आगामी काळात नाशिक बाजार समितीचे राजकारण कोणत्या दिशेने जाईल हे स्पष्ट झाले आहे.

भारतीय जनता पक्षाच्या कल्पना चुंभळे यांची बिनविरोध सभापतीपदी निवड झाली. त्यांनी आपला कार्यभार तातडीने स्वीकारला. पदभार हाती घेताच त्यांनी मावळते सभापती देविदास पिंगळे यांची कोंडी करण्यास सुरवात केली आहे. एकप्रकारे त्यांनी पिंगळे यांना थेट इशारा दिला आहे.

Kalpna Chumbhale & Devidas Pingle
Devadas Pingle Politics: बाजार समिती संचालकांची ‘पेट्यां’तून ‘खोक्यां’त उडी! २०० कोटी मागितल्याचा माजी सभापतींचा आरोप

सभापती श्रीमती चुंभळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे माजी सभापती पिंगळे यांनी हाती घेतलेला महत्वाकांक्षी खत प्रकल्प तातडीने रद्द करण्याचा निर्णय घेतला. या प्रकल्पामुळे बाजार समितीवर आर्थिक भार पडणार असल्याचा दावा त्यांनी केला. आगामी काळात नाशिक रोड तसेच गिरणारे, शिंदे, आणि पळसे उपबाजार सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली.

Kalpna Chumbhale & Devidas Pingle
BJP Politics : दुबईला गेलेल्या संचालकांनी कल्पना चुंबळे यांना केले सभापती! नाशकात भाजपने टाकलेले फासे

श्रीमती चुंभळे यांचे १५ विरुद्ध ० अशा मतांनी सभापतीपदी निवड झाली होती. श्रीमती चुंभळे यांच्यासोबत पती संचालक शिवाजी चुंभळे आणि दुबई येथे सहलीला गेलेले सर्व संचालक उपस्थित होते. त्यांनी एकमताने त्यांच्या निवडीचा प्रस्ताव मांडला. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि सचिव प्रकाश घोलप यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया झाली.

माजी सभापती माजी खासदार देविदास पिंगळे नेतृत्वाखाली निवडून आलेल्या उपसभापती विनायकराव माळेकर, संपतराव सकाळे, युवराज कोठुळे, भास्कर गावित, जगन्नाथ कटाळे, सविता तुंगार, चंद्रकांत निकम, जगदीश अपसुंदे, संदीप पाटील हे संचालक विरोधी गटासोबत गेले होते. याशिवाय राजाराम धनवटे, प्रल्हाद काकड आदी संचालकांनी श्रीमती चुंभळे यांना पाठिंबा दिला आहे.

श्रीमती चुंभळे यांनी आगामी काळात सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार असल्याचे सांगितले. नाशिक रोड आणि गिरणारे बाजार उपसमितीच्या विकासासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात येईल. बाजार समितीच्या आवारात महिलांना प्राधान्य देण्यात येईल. बंद पडलेली शौचालये खुले करणे. व्यापारी व शेतकऱ्यांसाठी भयमुक्त वातावरण यावर आपला भर राहणारे असल्याचे सांगितले.

-----

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com