नाशिक : युवराज छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhajirae) यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य (Swarajya) संघटनेच्या अधिकृत प्रवक्ते पदी येथील करण गायकर (Karan Gaikar) आणि डॉ धनंजय जाधव (Dhanajay Jadhav) यांची नियुक्ती करण्यात आली. शनिवारी त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. या संघटनेची ही पहिलीच नियुक्ती आहे. (yuvraj Chhatrapati Sambhajiraje given appointment letter to Karan Gaikar)
विस्थापितांना न्याय देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर शंभूराजे व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या आदर्शांवर चालत महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला संघटित करण्यासाठी "स्वराज्य" संघटनेची स्थापना करण्यात आलेली आहे. या संघटनेच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील शेतकरी, कामगार,विद्यार्थी महिला,शोषित अशा अनेक घटकांना न्याय देण्यासाठी सक्षम संघटन उभे करण्यात येणार आहे. सध्याची राजकीय परिस्थिती बघता कुठल्याही राजकीय पक्षाला सामाजिक प्रश्नांची जाणीव राहिलेली नाही.
राज्यात अनेक प्रश्न समोर असताना सर्व लोकप्रतिनिधी राजकीय पक्ष हे आपल्या मस्तीत स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी व्यस्त आहेत अशा परिस्थितीत या महाराष्ट्राची जी विचारधारा आहे ती जपण्यासाठी वरील सर्व घटकांना न्याय देण्यासाठी या स्वराज्या संघटनेची पुढील वाटचाल असणार आहे यासाठी या स्वराज्य संघटनेसाठी युवराज छत्रपती संभाजी राजे यांनी अधिकृत प्रवक्ते म्हणून करण गायकर व धनंजय जाधव यांची निवड केलेली आहे.
श्री गायकर व डॉ जाधव यांनी मराठा आरक्षण, शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिला,शोषित घटक यांसाठी अनेक सामाजिक आंदोलने व न्यायालयाच्या माध्यमातून विविध सामाजिक प्रश्नांची सोडवणूक केली आहे. तसेच समाजातील वंचित व शोषित घटकांसाठी ते गेल्या १४ वर्षांपासून कार्यरत आहेत.
विश्वास सार्थ ठरवीन
युवराज छत्रपती संभाजी महाराज यांनी जो विश्वास टाकला आणि जी जबाबदारी सोपवली आहे, ती सार्थ ठरवीन. येणाऱ्या काळात संघटनेची महाराष्ट्रात बांधणी करण्यासाठी मी रात्रंदिवस प्रयत्न करेल. - करण गायकर.
---
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.