बंडखोर आमदारांसाठी मुंबईतील रस्ते मोकळे केले...

बंडखोर आमदार १२ दिवसांनी मुंबईत परतले
Eknath Shinde
Eknath Shindesarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे शिवसेनेतील (Shivsena) बंड राज्यात ऐतिहासिक ठरले. तब्बल 12 दिवसांच्या खंडानंतर त्यांच्यासोबत असलेले आमदार आज मुंबईत परतले आहेत. या बारा दिवसात सत्तापालट झाला आणि स्वतः शिंदे मुख्यमंत्री झाले. या बंडात त्यांना 48 आमदारांना मोलाची साथ दिली. सुरत, गुवाहटी आणि गोवा असा प्रवास करत हे आमदार मुंबईत (Mumbai) पोहोचले. विमानतळ ते हॅाटेलमध्ये आमदारांना पौहचवण्यासाठी विशेष कॉरिडॉर निर्माण करण्यात आला होता.

या आमदारांना आणण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गोव्यात गेले होते. गोवा ते मुंबईमध्ये हॉटेल ताज प्रेसिडेंटपर्यंत शिंदे यांनी आमदारांसोबतच प्रवास केला. त्याच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. मुंबई विमानतळ हॉटेलपर्यंत या मार्गिकेवर मुंबई पोलिसांनी विशेष कॉरिडॉर तयार केला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली.

आमदारांना आणण्यासाठी भाजपचे (BJP) आमदार प्रसाद लाड हे विमानतळावर उपस्थित होते. शेकडोच्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तीन विशेष बसच्या माध्यमातून हे आमदार विमानतळामधून बाहेर पडले. मुंबई पोलीस उपायुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांनी यावेळी सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. ते स्वतः या आमदारांसोबत होते.

Eknath Shinde
शिंदेंची शिवसेनेने हकालपट्टी केली.. पण बंडखोरांनीही अशी तयारी केलीय...

या संपूर्ण रस्त्यावरही जागोजागी पोलिसांचा बंदोबस्त होता. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसाठी अशा प्रकारची सुरक्षा व्यवस्था असते. त्याच पद्धतीची सुरक्षा व्यवस्था या बंडखोर आमदारांसाठी ठेवण्यात आली आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ही सर्व खबरदारी घेण्यात आली आहे. आमदांसोबत जळपास ५० पोलिसांच्या गाड्या होत्या.

Eknath Shinde
नाना पटोले यांनी ती `चूक` केली नसती तर आज शिंदे-फडणवीस यांचे धाडस झाले नसते...

एकही गाडी रस्त्यावर दिसनार नाही, अशी व्यवस्था पोलिसांना केली होती. या आमदारांच्या सुरक्षेमुळे मात्र, सामान्य मुंबई करांना मोठा त्रास सहन करावा लागला. मुंबईमध्ये दोन दिवसांपासून पाऊस सुरु आहे. त्यातच संपूर्ण वाहतूक थांबवल्यामुळे नागरिकांची मोठी गौरसोय झाली. आमदार हॅाटेलवर पोहचल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी त्यांचे स्वागत केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com