Maratha Kranti Morcha Karan Gaikar News : 'मनोज जरांगे पाटील यांच्या नाशिक येथील सभेला गर्दीत नव्हती.' असा टोमणा छगन भुजबळ यांनी मारला होता. त्याला मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकर यांनी खुले आव्हान दिले आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण शांतता रॅलीचा समारोप नाशिकला झाला. या रॅलीला फक्त आठ हजार लोक होते. असे पोलिस सांगतात, असा म्हणत भुजबळंनी जरांगे पाटील यांना प्रतिसाद मिळत नसल्याचा दावा केला होता.
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ(Chhagan bhujbal) यांच्या या वक्तव्याला मराठा क्रांती मोर्चाचे गायकर यांनी उत्तर दिले आहे. भुजबळ यांनी जरांगे पाटील यांच्या सभेला किती गर्दी होती याची काळजी करू नये. त्यासाठी मैदानात यायला पाहिजे होतं. राहिला गर्दीचा प्रश्न, तो आम्ही केव्हाही दाखवून देऊ. येवल्याच्या विधानसभा निवडणुकीत मराठ्यांची संख्या किती, हे सुद्धा भुजबळ यांना लवकरच दिसेल. भुजबळ यांनी इतरांची काळजी करण्यापेक्षा स्वतःची उंची किती हे मोजावे. असे आव्हान त्यांनी दिले.
मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे(Manoj Jarange) पाटील यांच्या नाशिक येथे झालेल्या कार्यक्रमावर मंत्री भुजबळ यांनी निशाणा साधला होता. या सभेला अतिशय कमी गर्दी होती असा दावा त्यांनी पोलिसांच्या अहवालाच्या आधारे केला होता. त्यामुळे पुन्हा एकदा ओबीसी नेते छगन भुजबळ आणि सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नवा वाद उफाळून आला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जरांगे पाटील यांच्या या सभेला मिळालेला कमी प्रतिसाद आज सगळ्यांसाठीच चर्चेचा विषय आहे. मात्र या सभेत जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री भुजबळ यांना टीकेचे लक्ष्य केले होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) हे भुजबळ सांगितलं, तसे वर्तन करत असतात. मराठा समाजाला त्रास देण्याचा प्रयत्न करतात. आरक्षणाची मागणी मान्य करणे आवश्यक आहे. मात्र राज्य सरकारने माझी एसआयटीची चौकशी लावली आहे. समाज या सगळ्यांना योग्य ते प्रत्युत्तर देईल, असा दावा जरांगे यांनी केला होता.
मात्र त्यांनी फडणवीसांचे किती ऐकावे याचा देखील निर्णय घेण्याची गरज आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यास आगामी निवडणुकीत भुजबळ यांच्याबरोबरच भारतीय जनता पक्षाचा योग्य तो धडा शिकवला जाईल, असा इशारा देण्यात आला होता.
आता या संदर्भात करण गायकर यांनी थेट भुजबळ यांना आव्हान दिले आहे. या आगामी विधानसभा निवडणूक आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न या दोन्ही संदर्भात पुढील आठवड्यात अंतरवाली सराटी येथे बैठक होणार आहे. या बैठकीत पुढील निर्णय होईल. त्यामुळे भुजबळ विरुद्ध जरांगे पाटील हा संघर्ष अधिक तीव्र होण्याचे चिन्हे आहेत.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.