Gaikar Vs Padalkar : गोपीचंद पडळकरांचे बोलवते धनी कोण? हे मराठा समाजाला चांगलंच ठाऊक - करण गायकर

Maratha Reservation : ''स्वार्थासाठी स्वतःचा समाज दावणीला बांधणाऱ्याने इतर कोणावर बोलण्याची हिंमत करू नये,'' असंही गायकर म्हणाले आहेत.
Gopichand Padalkar and Karan Gaikar
Gopichand Padalkar and Karan GaikarSarkarnama

Nashik News : ''आमदार गोपीचंद पडळकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर भाष्य करताना जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्यं करून जाती-जातीत भांडणे लावू नयेत,'' असा इशारा छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी दिला आहे. शिवाय पडळकरांचे बोलवते धनी कोण आहेत? याचीही समाजाला कल्पना असल्याचे करण गायकर यांनी म्हटले आहे.

करण गायकर यांनी इशारा निवेदनात म्हटले आहे की, ''मराठा समाजाच्या हक्काची लढाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या माध्यमातून चालू आहे. उपेक्षित वंचित समाजाला न्याय मिळायला हवा, या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा ही या मराठा आरक्षणाच्या लढ्यामागे आहे.

हे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील वारंवार सांगतात. तरीही आमदार गोपीचंद पडळकर हे फक्त राजकीय अभिनिवेश बाळगून जरांगे पाटील आणि एकूणच मराठा समाजाच्या विद्यमान आंदोलनाविषयी बोलत आहेत. पडळकर यांचा या मागचा बोलविता धनी कोण? याविषयी मराठा समाज चांगलाच जाणून आहे.''

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Gopichand Padalkar and Karan Gaikar
Jayakwadi Water Issue : 'समन्यायी'चा चुकीचा अर्थ काढून जायकवाडीला सोडलेले पाणी थांबवा - संगमनेर काँग्रेसची मागणी!

''याउलट मराठा योद्धा जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, मी कधीही राजकारणात जाणार नाही. राजकारणापासून दूर राहणार, माझ्या समाजाला आरक्षण मिळावे ही माझी प्रामाणिक अपेक्षा आहे. ती लढाई लढताना मी कोणत्याही राजकीय पक्षांना व्यक्तींना सोबत घेऊन नव्हे, तर सर्वसामान्य गोरगरीब मराठ्यांना सोबत घेऊन ही आरक्षणाची लढाई लढणार आहे.

कारण आरक्षण हे माझ्या गरीब मराठ्यांना पाहिजे. हे वास्तव लक्षात घेऊन गोपीचंद पडळकर यांनी बोलताना तरी आता आपल्या अकलेचे तारे तोडू नयेत, अशी समज मराठा समाजाच्या वतीने देत आहे,'' असं करण गायकर यांनी इशारा निवेदनात म्हटले आहे.

याशिवाय ''महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही वेळोवेळी जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षण लढायला समर्थन दिले आहे. तसेच मराठा समाजाला योग्यरीत्या आरक्षण मिळवून देण्याचं काम मनोज जरांगे करत आहेत, असेही ते स्पष्टपणे बोलत आहेत.''

तसेच, मराठा समाज त्याची न्याय हक्काची लढाई लढत असताना आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून सोबत आहोत, असं अनेक दलित चळवळीतील नेते बोलत असताना गोपीचंद पडळकर यांना हे विधान करण्याचे कारण काय?'' असा सवालही गायकर यांनी उपस्थित केला आहे.

Gopichand Padalkar and Karan Gaikar
Maratha Reservation : भुजबळांची जी मागणी, तीच सरकारची भूमिका : मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली मोठी माहिती

याचबरोबर ''गोपीचंद पडळकर यांनी आत्तापर्यंत ओबीसी समाजाचा किती गैरवापर केला? धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत किती चुकीच्या पद्धतीने काम केले, हे आम्हाला सांगायची वेळ येऊ देऊ नये. ज्या माणसाने स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःचा समाज दावणीला बांधला, त्या माणसाने इतर कोणावर बोलण्याची हिंमत करू नये,'' अशी टीका गायकरांनी केली आहे.

''मराठा समाज कुठल्याही जाती-धर्माला न दुखावता संविधानिक पद्धतीने आपल्या आरक्षणाची लढाई लढत आहे. त्याला साथ देता येत नसेल तर किमान विरोध करण्याचं धाडसही इतर नेत्यांनी करू नये, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी दिला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com