Ram Shinde On Ajit Pawar : अजित पवार माझ्या पराभवाच्या कटात सामील; राम शिंदेंचा मोठा आरोप

Ram Shinde accuses Ajit Pawar of being involved in his defeat: कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील पराभवावर भाजपचे प्रा. राम शिंदे यांनी अजित पवार यांच्याकडे बोट दाखवले आहे.
Ram Shinde
Ram ShindeSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar News : कर्जत जामखेडमधील भाजप आमदार प्रा. राम शिंदे यांना पराभव चांगलाच जिव्हारी लागलाय. या पराभवाचे खापर त्यांनी आमदार रोहित पवार यांचे काका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्यावर फोडले आहे.

'माझा पराभव नियोजन कट होता. यात माझा बळी गेला. यात अजित पवार कुठेतरी सामील होते', असा गंभीर आरोप राम शिंदे यांनी केला आहे.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने त्यांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी अजित पवार (Ajit Pawar) सातारा इथल्या कराड इथं होते. त्यावेळी शरद पवार यांच्याबरोबर आमदार रोहित पवार आले होते. शरद पवार पुढे निघून गेल्यावर तिथं रोहित पवार यांनी मागून आलेल्या अजित पवार यांची भेट घेतली.

Ram Shinde
Ajit Pawar : 'सीएम' पदावरून महायुतीत बरीच ताणाताणी; अजितदादांचे मोठं विधान...

अजित पवार यांनी रोहित पवार यांना पाया पडायला लावून आशीर्वाद लगावला आणि पुढे मिश्किल टिप्पणी केली. म्हणाले, 'बेट्या थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...', अशी टिप्पणी करताच तिथं जमलेल्यांमध्ये एकच हशा पिकला. रोहित पवार (Rohit Pawar) यांनी यावर प्रतिक्रिया देखील आहे. 2019 मध्ये माझ्या विजयात अजितदादांचा मोठा वाटा राहिला आहे. यावेळी ते बारामतीत गुंतून पडले होते. त्यांची कर्जत-जामखेडमध्ये सभा झाली असती, तर उलट-सुलट किंवा माझ्यासाठी अधिक चांगलेच झाले, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

Ram Shinde
Kardile Vs Tanpure : कर्डिले अन् तनपुरे समर्थकांमध्ये धुमश्चक्री; गोळीबार, चौघे जखमी

दरम्यान, हाच धागा पकडत भाजपचे प्रा. राम शिंदे यांनी अजित पवार यांच्या भूमिकेवर गंभीर आरोप केले. "कर्जत-जामखेडमध्ये माझा पराभव नियोजित कट होता. यात माझा बळी घेतला गेला. आमदार रोहित पवार स्वतःला भावी मंत्री, भावी मुख्यमंत्री समजत होते. त्यांनी या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला नाही. एकूणच राजकीय सारीपाठामध्ये जे घडले त्यांचा मी बळी ठरलो", असे राम शिंदे यांनी म्हटले.

याबाबत पक्षश्रेष्ठींना अगोदर कल्पना दिली होती. निवडणुकीवेळी थेट तक्रारी देखील केल्या होत्या. माध्यमांसमोर या विषयावर बोलायचे नव्हते. पण सुरवात अजित पवार यांनी केली म्हणून, बोलावे लागले.राज्यात खूप कमी फरकाने पराभव झाल्यांमध्ये माझ्या नावाचा समावेश आहे. माझ्याविरोधात अघोषित कारवाईच्या कटाचा मी बळी ठरलो. आमच्या वरिष्ठांनी यात गांभीर्याने लक्ष घातले पाहिजे. फेरमोजणीचा अर्ज केला होता. तो फेटाळण्यात आला. जिल्हाधिकारी यांची भेट घेणार असल्याचेही राम शिंदे यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com