Ajit Pawar : 'सीएम' पदावरून महायुतीत बरीच ताणाताणी; अजितदादांचे मोठं विधान...

Tension in Mahayuti alliance over Maharashtra CM post: महायुतीच्या सत्तास्थापनावरून आणि मुख्यमंत्रीपदावरून बरीच ताणाताणी होणार असल्याचे संकेत अजित पवार यांच्या विधानातून समोर आलं आहे.
Eknath Shind Devendra Fadnavis Ajit Pawar
Eknath Shind Devendra Fadnavis Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महायुतीला विधानसभेला स्पष्ट बहुमत मिळाल्याने मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची नावे मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेत आहेत. परंतु यातून बरीच ताणाताणी महायुतीत सुरू असल्याचे दिसते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी मात्र मुख्यमंत्री पदाबाबत मोठे भाष्य केले. महायुतीत सीएम पदाचा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही. आम्ही एकत्र बसून निर्णय घेणार आहोत, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

अजित पवार म्हणाले, "'सीएम' पदाचा फॉर्म्युला काहीच ठरलेला नाही. पक्षातील आमदारांनी नेतापदी निवड केली. सर्व अधिकार दिले. तसेच एकनाथ शिंदे यांची देखील त्यांच्या आमदारांनी नेतेपदी निवड केली. भाजप (BJP) मोठा पक्ष आहे, ते त्यांचे ठरवतील". परंतु मुख्यमंत्रीपदाबाबत कोणताही फॉर्म्युला तयार झालेला नाही. यावर आता आम्ही एकत्र बसणार आहोत. वरिष्ठ, सहकाऱ्यांशी चर्चा करू. राज्याला मजबूत आणि स्थिर सरकार देऊ, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

Eknath Shind Devendra Fadnavis Ajit Pawar
Ajit Pawar : टायमिंग जुळलं नाही; अजितदादा म्हणाले, 'नाहीतर पवारसाहेबांचे...'

निवडणूक आयोगाने सत्ता स्थापनेचा वेळ दिलेला आहे का, यावर अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, "27 तारखेच्या आत राज्य स्थापन झाले पाहिजे, असे काही नाही. राष्ट्रपती राजवट लागू होईल, असे काहीही होणार नाही. निवडणूक आयोगाला सर्व निवडून आलेल्या आमदारांची माहिती दिली". विरोधी पक्ष नेते देखील निवडता येणार नाही, असे बहुमत मिळाले आहे. विरोधकांचा मान-सन्मान ठेवला जाईल. सभागृह चालवताना सन्मान देणार. महायुतीच्या कार्यकर्त्यांना, सहकारी यांना विश्वासात घेऊ. अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊ. केंद्रात आणि राज्यात एकच सरकार असल्याने सरकार मजबूत चालणार आहे, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.

Eknath Shind Devendra Fadnavis Ajit Pawar
Nana Patole यांनी एका वाक्यात विषयच संपवला |Congress|Maharashtra Congress State President|Sarkarnama

"विधानसभेत विरोधी पक्षनेता होण्यासाठी एकाच पक्षाला 29 आमदार निवडून आलेले पाहिजे. परंतु नियमानुसार तसे झालेले नाही. लोकसभेत देखील विरोधी पक्षनेता होण्यासाठी 58 खासदार एकाच पक्षातील हवे असतात. पण तिथे देखील विरोधी पक्षनेता नव्हता. आता विधानसभेला नियमानुसार होईल. परंतु विरोधकांचा सन्मान ठेवला जाईल. त्यांच्या प्रश्नांचा आदर ठेवला जाईल, जनतेने दिलेला कौल मोठा आहे. त्यामुळे जबाबदारी वाढली आहे", असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

हे चुकीचे... : अजित पवार

अजित पवार यांनी त्यांच्याविरोधात उभा असलेल्या पुतण्या युगेंद्र पवार यांच्या पराभवावर देखील टिप्पणी केली. हे योग्य नव्हतं, असे अजित पवार यांनी म्हटले. ते म्हणाले, "लोकसभेला माझी चुक झाली. हे मी सांगून दमलो. मात्र घरातील लोकांनाच एकमेकांविरोधात उभं करणे हे योग्य नाही. माझ्या सख्या भावाच्या मुलाला, म्हणजेच माझ्या सख्या पुतण्याला माझ्यासमोर उभं करण्याचे काहीच कारण नव्हते". बाबा आत्राम यांच्याबरोबर तेच झाले. शिंदेंसाहेबासमोर देखील त्यांची सखी पुतणी उभी करण्यात येणार होती, असेही अजित पवार यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com