Karjat Jamkhed Assembly Election : निकाल काय लागणार? 'या' तणावात दोघांचे 'हार्ट फेल'

Karjat Jamkhed Assembly Election Result Rohit Pawar Ram Shinde : कर्जत-जामखेडमध्ये मतदारसंघात राम शिंदे की, रोहित पवार विजय होणार, या तणावात दोघा निष्ठावान कार्यकर्त्यांना मृत्यूने कवटाळले.
Karjat Jamkhed Assembly Election
Karjat Jamkhed Assembly ElectionSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar News : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील निकालीची उत्सुकता राज्यात वाढली होती. मतमोजणीच्या शेवटच्या फेरीपर्यंत राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यात विजयाची चुरस रंगली होती. यातून दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांचा काळजाचा ठोका चूक होता.

यातच शेवटच्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पवार विजयी झाले. परंतु भाजपचे राम शिंदे आणि त्यांच्यात रंगलेल्या विजयाच्या चुरशीत कर्जत जामखेडमधील दोघांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कर्जत-जामखेड विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या शेवटच्या फेरीपर्यंत कोण बाजी मारेल, याची उत्सुकता रंगली होती. आमदार रोहित पवार यांचे मताधिक्य कमी-जास्त होत असल्याने त्यांच्या दोघा समर्थकांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) आपल्या समाज समाजावरील खात्यावर ही माहिती दिली.शिंपोरा (ता.कर्जत) येथील यजेराव दिनकर काळे (वय 75) आणि घोडेगाव (ता.जामखेड) येथील नजीर हसन सय्यद (वय 45) असे मृत्यू झालेल्या दोघांचे नाव आहे.

Karjat Jamkhed Assembly Election
Amol Khatal : ''ते' विधान आले नसते, तरी विखे अन् माझ्यावर हल्ल्याचा प्लॅन होता'; आमदार खताळांचा मोठा गौप्यस्फोट ...पाहा VIDEO

कर्जत-जामखेड विधानसभा निवडणुकीच्या शनिवारी झालेल्या मतमोजणीत (Voter) अखेरच्या क्षणापर्यंत आमदार रोहित पवार यांना निसटता विजय मिळाला. अवघ्या 1 हजार 243 मतांनी भाजपचे प्रा. राम शिंदेंचा पराभव झाला. प्रथमताच अखेरच्या फेरीपर्यंत विधानसभेचा निकाल रंगला गेला. या मतमोजणीच्या फेरीत कधी रोहित पवार, तर कधी प्रा. राम शिंदे आघाडी-पिछाडी घेताना दिसत होते. यात आघाडी-पिछाडीने नेत्यांपेक्षा त्यांच्या समर्थकांनी देखील मोठी धास्ती घेतली होती.

Karjat Jamkhed Assembly Election
Ram Shinde On Ajit Pawar : अजित पवार माझ्या पराभवाच्या कटात सामील; राम शिंदेंचा मोठा आरोप

यातच शिंपोरा (ता.कर्जत) येथील शरद पवार यांचे निष्ठावान कार्यकर्ते असणारे 75 वर्षांचे यजेराव दिनकर काळे यांना आमदार रोहित पवारांचे कमी-जास्त होणारे मताधिक्याच्या बातमीने धक्का बसला. यातच त्यांचे दुर्दैवी निधन झाले. यासह जामखेड तालुक्यातील घोडेगाव येथील बूथ कार्यकर्ते राजू सय्यद यांचे वडील नजीर हसन सय्यद (वय 45) यांचा देखील आमदार पवारांच्या कमी-जास्त मताधिक्याच्या बातम्याने धक्का बसला होता. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात ॲडमिट केले होते. परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या दोन्ही घटनेवर आमदार रोहित पवार यांनी शोक व्यक्त करीत त्यांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे म्हणत दोन्ही निष्ठावान व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मतमोजणी तब्बल 11 तास चालली

कर्जत-जामखेड विधानसभेची 356 मतदान केंद्राची मतमोजणी 14 टेबलवर एकूण 27 फेरीत रंगली. पहिल्यांदाच पहिल्या फेरीपासून ते शेवटच्या फेरीपर्यंत प्रतिस्पर्धी असणारे भाजप महायुतीचे प्रा. राम शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पवार यांच्यात चुरस होती. कधी पवार पुढे, तर कधी शिंदे, असे चित्र वारंवार पहावयास मिळाले. यामुळे समर्थक आणि कार्यकर्ते अखेरच्या फेरीपर्यंत चिंताग्रस्त आणि काळजीत होते. अंतिम क्षणी रोहित पवार यांचा विजय झाला. कर्जत-जामखेडची मतमोजणी तब्बल 11 तास चालली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com