
Maharashtra local politics 2025 : कर्जत नगरपंचायतीमधील सत्तांतरावर अखरेचा पडदा पडायला सुरुवात झाली आहे. भाजप आमदार तथा विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना पुन्हा राजकीय पातळीवर धक्का दिला.
आमदार पवार गटाचे कर्जत नगरपंचायतीमधील अमृत काळदाते यांचा गटनेतेपदाचा अर्ज जिल्हाधिकारी फेटाळला. कर्जत नगरपंचायतीत राम शिंदे यांच्याबरोबर असलेल्या बंडखोर नगरसेवकांची सत्ता अधिकच मजबूत झाली. जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयावर आमदार पवार गट पुन्हा न्यायालयात धाव घेणार का? याकडे आता लक्ष असणार आहे.
कर्जत नगरपालिकेत 2022 मध्ये आमदार रोहित पवारांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या साह्याने 17 पैकी 15 जागेवर विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली. कर्जत नगरपंचायतीमध्ये सत्तांतर घडवले. भाजपचा (BJP) धुळ चारली होती. या निवडणुकीत भाजपचे फक्त दोनच नगरसेवक निवडून आले. एकप्रकारे कर्जत नगरपालिकेत आमदार रोहित पवार यांची एकहाती सत्ता होती.
आमदार रोहित पवार यांच्या सत्ताधारी गटातील नगरसेवकांनी बंडखोरी करत नगराध्यक्ष उषा राऊत यांची सत्ता उलथवली. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला. आमदार पवार (Rohit Pawar) यांच्या गटातील बंडखोरी 11 नगरसेवकांसह विरोधी भाजपच्या 2 अशा एकूण 13 नगरसेवकांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. उषा राऊत यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे नगराध्यक्षपदाचा राजीनामा सोपवला. काँग्रेसच्या रोहिणी घुले यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. उपनगराध्यक्ष निवड होणे आता बाकी आहे. तत्पूर्वी गटनेतेपदाचा वाद रंगला. बंडखोर नगरसेवकांच्या गटामध्येच गटनेतेपद गेल्याने नगराध्यक्ष निवडीवेळी मतदानासाठी व्हीप बजावत आमदार पवार गटाकडे असलेल्या नगरसेवकांची कोंडी केली.
नगरसेवकांच्या बंडखोरीनंतर आमदार पवार गटाकडील नगरसेवकांनी गटनेता बदलला होता. नगरसेवक अमृत काळदाते यांच्याकडे ही जबाबदारी दिली होती. नगराध्यक्षासह नगरसेवकांच्या संमतीने माझी गटनेता व नगरसेविका प्रतिभा भैलुमे यांची उप गटनेता म्हणून निवड करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नोंदणी करावी, अशी मागणी केली होती. परंतु बंडखोर सत्ताधारी नगरसेवक गटाच्यावतीने संतोष मेहेत्रे यांनी गटनेतेपदी आपलीच निवड ग्राह्य धरावी, अशी मागणी केली.
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दोन्हीकडील युक्तिवाद एकूण घेतल्यानंतर काळदाते यांची मागणी फेटाळून लावली. अमृत काळदाते यांनी यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेत फेरविचार करण्याची याचिका दाखल केली. न्यायालयाने संतोष मेहेत्रे यांच्या निवडीला स्थगिती दिली होती. तसेच जिल्हाधिकारी यांना पुन्हा निर्णय घेण्याचा आदेश केला.
यावरून सत्ताधारी गटाचे गट नेते संतोष मेहेत्रे यांच्यासह अकरा नगरसेवक आणि विरोधी गटातील गट नेते अमृत काळदाते यांच्यासह चार नगरसेवक तसेच दोन्ही पक्षांकडील वकिलांनी जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांच्यासमोर युक्तिवाद करत म्हणणे मांडले होते. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी अमृत काळदाते यांचा अर्ज फेटाळला. याचबरोबर आमदार पवार यांच्या गटाला पुन्हा एकदा राजकीय धक्का बसला आहे. बंडखोर नगरसेवकांकडे एकहात्ती सत्तेचं नेतृत्व असणार आहे.
भाजपचे राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंडखोर नगरसेवकांनी नगराध्यक्ष अन् उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीचा फाॅर्म्युला ठरवलेला आहे. त्यानुसार नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या रोहिणी घुले यांची बिनविरोध निवड झाली आहे. उपनगराध्यक्षपदी संतोष मेहेत्रे यांचे नाव निश्चित आहे. ही निवड झाल्यानंतर दोन्ही पदाधिकारी कर्जत नगरपंचायतीचा कार्यभार हाती घेतील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.