
Civil defence education in India : भारत-पाकिस्तान, या दोन्ही देशात युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगलाच तणाव निर्माण झाला. देशांतर्गत देखील या दोन्ही देशातील तणावामुळे राजकीय शाखेशी निगडीत असलेल्या समाजशास्त्र, मानसशास्त्र, संरक्षणशास्त्र, कायदेशास्त्र, इतिहाससह विज्ञानाशी निगडीत असलेल्या सर्वच शाखांवर परिणाम झालाय.
आपत्कालीन परिस्थितींमध्ये प्रतिसाद यंत्रणेची भूमिका महत्त्वाची असल्याने महाराष्ट्रातील महायुती सरकारने मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात नागरी संरक्षण (सिव्हिल डिफेन्स) हा विषय समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई (Mumbai) विद्यापीठ आणि सिव्हिल डिफेन्स संचालनालय यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. त्यानुसार नागरी संरक्षण अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यावर अंतिम शिक्कामोर्तब झाले आहे. सिव्हिल डिफेन्सचे संचालक प्रभात कुमार यांनी या माहितीला दुजोरा दिला.
हा नवा अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठाशी संलग्न सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये (College) शिकवला जाणार असून, त्याला 25 गुणांचे महत्त्व असेल. या माध्यमातून देशसेवा करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी मिळेल, तसेच आपत्कालीन परिस्थितीत मदतकार्य आणि जीव वाचवण्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे.
विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापन कक्ष, अग्निशमन दल, रुग्णालये आणि अशा सरकारी व स्थानिक संस्थांबरोबर काम करण्यास तयार केले जाईल. विशेषतः आपत्तीजन्य व युद्धसदृश परिस्थितीत त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. या यंत्रणेकडे कर्मचारी, वाहने, सायरन तसेच प्रशिक्षण साधनसामग्रीची कमतरता आहे. सिव्हिल डिफेन्ससाठी मंजूर कर्मचारी संख्या 420 असली, तरी राज्यात सध्या केवळ 135 कर्मचाऱ्यांवर काम सुरू आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून रिक्तपदे भरण्यास मदत होईल, असे सांगितले जात आहे.
आपत्तीच्या वेळी सिव्हिल डिफेन्सकडे स्वतःची रुग्णवाहिका व वाहने असणे आवश्यक असते. मात्र सद्यस्थितीत अनेक वाहने नादुरुस्त आहेत. स्वयंसेवकांना प्रतिदिन केवळ 150 रुपये भत्ता दिला जातो. हा भत्ता वाढवून 500 रुपये करण्याचा प्रस्ताव सरकारकडे सादर केला आहे. याशिवाय कर्मचारीवाढ, प्रशिक्षण साहित्य आणि सायरन पुरवठा यासंबंधीचे प्रस्तावही सरकारला पाठवण्यात येणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.