Ram Shinde News : कर्नाटक विधानसभेची रणधुमाळी; राम शिंदेंवर भाजपने सोपवली मोठी जबाबदारी!

Karnataka BJP News : राम शिंदे अयोध्याच्या दौऱ्यानंतर कर्नाटकातील मोहिमेसाठी रवाना
Ram Shinde News
Ram Shinde NewsSarkarnama

Karnataka Politics : कर्नाटक विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी १० मे रोजी मतदान पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कर्नाटकमध्ये राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणूक बहुमताने जिंकायची या इराद्याने भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या निवडणुकीसाठी भाजपने देशातील तब्बल 54 बड्या नेत्यांची फौज तयार केली आहे. यामध्ये स्टार प्रचारक म्हणून महाराष्ट्रातील काही नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.

Ram Shinde News
BJP official News : मुलांना संस्कार देण्यात कमी पडल्याची खंत, भाजप पदाधिकाऱ्याची आत्महत्या..

महाराष्ट्रातील भाजपचे नेते राम शिंदे यांच्यावर कर्नाटकच्या अनेकल विधानसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिंदे कर्नाटक दौर्‍यावर रवाना झाले असून पुढील काही दिवस ते या मतदारसंघात ते तळ ठोकणार आहेत.

Ram Shinde News
Chandrakant Patil News: ''...म्हणून उध्दव ठाकरेंना फोन करणार!''; राजकीय गदारोळानंतर चंद्रकांत पाटलांचा सूर बदलला

दरम्यान, कर्नाटक विधानसभेसाठी काँग्रेसकडून 124 जाणांची पहिली यादी त्यानंतर 41 उमेदवारांची दुसरी यादीही जाहीर करण्यात आली आहे. तर भाजपही लवकरच आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करणार आहे. त्यामुळे कर्नाटक विधानसभेची रणधुमाळी पाहायला मिळत आहे.

(Edited By Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com