Assembly Election 2024: जिल्हा बँक डबघाईला गेली आहे. बँकेच्या या अवस्थेला जबाबदार विविध दहा संचालक विधानसभा निवडणुकीत मतदारांचा कौल घेत आहेत. मात्र बँकेमुळे देशोधडीला लागलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कोणीही तोंड उघडत नसल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.
शेतकरी व जिल्हयाच्या अर्थकारणाशी नाडी असलेली नाशिक जिल्हा बॅंक आर्थिक अडचणीत आहे. अडचणीत सापडलेल्या या बॅंकेचे दहा माजी संचालक विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. जिल्हा बॅंकेच्या राजकारणात मांडीला मांडी लावून बसत आघाडीचे राजकारण करणारे संचालक विधानसभा निवडणुकीच्या आखाडयात मात्र, एकमेकांसमोर ठाकले गेले आहेत.
विधानसभेची पहिली पायरी म्हणून नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडे पाहिले जाते. जिल्हा बॅंकेत आल्यानंतर अनेकांना विधानसभेची वाट मिळते, त्यासाठी अनेकांची जिल्हा बॅंकेत येण्यासाठी चढाओढ सुरू असते. जिल्हा बॅंकेत पोहचल्यावर अनेकांना मुंबईची वाट मिळाली असल्याचे दिसून आले आहे. जिल्हा बॅंकेवर प्रशासक असल्याने, संचालक मंडळ बरखास्त झालेले आहे.
माजी संचालक असलेले तब्बल ८ तर, गत संचालक मंडळातील २ असे एकूण १० माजी संचालक हे विधानसभा निवडणुक लढवत आहे. यामध्ये अध्यक्ष केदा आहेर (चांदवड), आमदार सुहास कांदे (नांदगाव), शिरीष कोतवाल (चादंवड), माणिकराव कोकाटे (सिन्नर), दिलीप बनकर (निफाड)
यातही जिल्हा बॅंकेच्या राजकारणात एकमेकांसमवेत असलेले विधानसभा निवडणुकीत एकमेकांसमोर निवडणुक लढवत आहे. यात प्रामुख्याने जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष केदा आहेर, माजी संचालक शिरीष कोतवाल यांचा समावेश आहे. आहेर यांच्या अध्यक्ष निवडीला कोतवाल यांचा गटाने आहेर यांना मदत केली होती. मात्र, चांदवड-देवळा मतदारसंघातून दोघेही एकमेकांसमोर निवडणुकीला सामोरे जात आहे. आहेर येथे अपक्ष तर कोतवाल हे कॉंग्रेसकडून रिंगणात उतरले आहेत. निफाड विधानसभा मतदारसंघातही दोन माजी संचालक निवडणुकीत एकमेकांसमोर निवडणुक लढवित आहे.
येथे माजी संचालक दिलीप बनकर यांच्या विरोधात माजी संचालक अनिल कदम रिंगणात आहे. याशिवाय काही माजी संचालकही निवडणुकीत उतरलेले आहे. यात, सलग पाच वर्षे उपाध्यक्षपदाची धुरा सांभाळलेले सुहास कांदे नांदगाव मतदारसंघातून तर, सिन्नरमधून माजी संचालक अॅड. माणिकराव कोकाटे रिंगणात उतरले आहे. कळवण-सुरगाणा मतदारसंघातून माजी संचालक जे. पी. गावीत, माजी अध्यक्ष असलेले अव्दय हिरे हे मालेगाव बाहय मतदारसंघातून निवडणुक लढवित आहे. माजी संचालिका सीमा हिरे नाशिक पश्चिम मधून तिस-यांदा निवडणुकीला सामोरे जात आहे. याशिवाय गत संचालक मंडळातील वंसत गिते हे नाशिक मध्य तर, माणिकराव शिंदे हे येवला मतदारसंघातून नशीब अजमावित आहे.
जिल्हयाच्याही प्रचारातून मुद्दा गायब
दरम्यान, माजी संचालक निवडणुक लढवत आहे. या सर्वांचा निवडणुकीत जोमाने प्रचार सुरू आहे. तथापि प्रचारातून जिल्हा बॅंक आर्थिक स्थितीचा मुद्दाच हरविला असल्याचे दिसून येत आहे.जिल्हयाच्या कोणत्याही मतदारसंघात हा मुद्दा केंद्रस्थानी दिसत नाही. वर्षभरापूर्वी जिल्हा बॅंकेच्या आर्थिक स्थितीमुळे तीचा परवाना धोक्यात सापडला होता. त्यावेळी पालकमंत्री दादा भुसे, मंत्री छगन भुजबळ यांसह जिल्हयातील आमदार, खासदरांनी बॅंक वाचविण्यासाठी धावपळ केली. सरकारकडे मदतीसाठी साकडे घातले.मात्र, मदत मिळाली नाही. निवडणुकीत मात्र, या विषयावर फारसे बोलतांना कोणीही दिसत नाही.
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.