Sharad Pawar politics: पवारांनी फटकारले," छगन भुजबळ धोकेबाज, त्यांना येवल्यात पराभूत करा"

Sharad Pawar; Defeat the rookie Chhagan Bhujbal from Yeola-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभेला येवला मतदारसंघात आज अभूतपूर्व प्रतिसाद, सर्व नेते एकत्र आले.
Sharad Pawar & Manikrao Shinde
Sharad Pawar & Manikrao ShindeSarkarnama
Published on
Updated on

Pawar Vs Bhujbal News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांची आज येवला मतदारसंघात सभा झाली. या सभेला मोठा प्रतिसाद मिळाला. मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा येवल्यातून पुन्हा संधी देऊ नका, असे थेट आवाहन पवार यांनी यावेळी केले.

मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची सभा झाली. यावेळी पवार यांनी भुजबळ यांना येवल्यात आणले, ही माझी चूक झाली. ही चूक आता आपण सगळ्यांनी दुरुस्त करायची आहे. या फसवेगिरी करणाऱ्या व्यक्तीला येवलेकरांनी मतदान करू नये, असे आवाहन त्यांनी केले.

Sharad Pawar & Manikrao Shinde
Sharad Pawar : जामनेर मध्ये 'हा' उमेदवार ठरणार निलेश लंके प्रयोगाची पुनरावृत्ती!

शरद पवार यांच्या या सभेला मोठी गर्दी होती. व्यासपीठावर मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांचे नेते उपस्थित होते. उमेदवार माणिकराव शिंदे यांनी पवार यांचे स्वागत केले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांसह विविध नेते उपस्थित होते.

Sharad Pawar & Manikrao Shinde
Sharad Pawar : "नरहरी झिरवाळ विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाही, सुनीता चारोस्कर हजारपट भारी उमेदवार"

यावेळी श्री पवार यांनी भुजबळ यांचा सबंध राजकीय इतिहासच मांडला. ते म्हणाले, भुजबळ शिवसेनेत असताना त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधातच भूमिका घेतली. त्याबाबत शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड चीड होती. त्यावेळी त्यांनी मला संरक्षण द्या. माझ्या जीवाला धोका आहे, अशी विनवणी आमच्याकडे केली. त्यांना आम्ही संरक्षण देऊन नागपूरला ठेवले.

श्री. भुजबळ यांना संधी द्यावी म्हणून आम्ही मंत्रिमंडळात स्थान दिले. मंत्रिमंडळात स्थान दिल्यावर ज्या पदावर ते काम करत होते, त्यात त्यांनी वेगळीच कामे करायला सुरुवात केली. त्यामुळे ते अडचणीत आले. त्यांना मंत्रीपद सोडावे लागले. त्यानंतर त्यांनी आम्हाला एक संधी द्यावी, पुन्हा अशा चुका होणार नाहीत अशी विनंती केल्यावर आम्ही त्यांना पुन्हा संधी दिली. राज्याच्या मंत्रिमंडळात आल्यावर त्यांनी पुन्हा काही गंभीर चुका केल्या. त्यामुळे आमची सत्ता गेली, असा गंभीर आरोप केला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असलेल्या सरकारमध्ये देखील श्री. भुजबळ यांना आम्ही महत्त्वाचे खाते देऊन पुनर्वसन केले. त्यातही त्यांनी काही गफलती केल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. काही आमदार निघून गेले. ही फूट पडल्यावर आणि आमदार सोडून गेल्यावर पक्ष नव्याने उभा करण्याचा निर्णय मी घेतला. त्यावेळी छगन भुजबळ माझ्याकडे आले. त्यांनी मला हे कसे झाले?. त्या लोकांना समजावून सांगण्याची गरज आहे. त्यांचे मतपरिवर्तन करण्यासाठी मी जातो, असे सांगून ते गेले.

त्यानंतर भुजबळ पुन्हा परत आलेच नाही. दुसऱ्या दिवशी त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. अशा अनेक चुका आणि धोके त्यांनी दिले. अशा धोकेबाज माणसाला येवलेकरांनी मतदान करू नये. ते पुन्हा एकदा येवल्यात मतदारांसमोर आले आहेत. मात्र यावेळी वातावरण वेगळे आहे. विविध घटक आणि येवलेकर एकत्र आले आहेत. त्यांनी आपला निर्धार कायम ठेवावा. माणिकराव शिंदे यांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

श्री. भुजबळ मतदारसंघात परिस्थिती खराब करीत असतील, तर तुम्ही त्याला उत्तर देण्यास तयार रहा. तुमच्या मागे मी उभा राहील. मी स्वतः येवल्याच्या कार्यकर्ते आणि जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन. भुजबळ यांना येवल्यात आणून माझी चूक झाली .ती या निवडणुकीत येवल्याच्या जनतेने सुधारावी, असे आवाहन श्री पवार यांनी केले. त्याला उपस्थितांनी दोन्ही हात उंचावून प्रतिसाद दिला. "ही लढाई आम्ही जिंकू" हे वाक्य दोनदा उच्चारत भुजबळ यांना पराभूत करा याचा पुनरुच्चात पवार यांनी केला.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com