Shivsena News: या पुढची प्रत्येक लढाई आपल्याला जिंकायची आहे!

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे, डॉ. रवींद्र पवार यांनी समर्थकांसह उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
Bharat Kokate With Uddhav Thackrey
Bharat Kokate With Uddhav ThackreySarkarnama

सिन्नर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचे बंधू भारत कोकाटे (Bharat Kokate) व सोनांबेचे सरपंच डॉ. रवींद्र पवार (Dr. Ravindra Pagar) यांनी माजी आमदार राजाभाऊ वाजे, (Rajabhau Waje) जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांच्या उपस्थितीत समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. (NCP MLA`s brother joins Shivsena in sinner)

Bharat Kokate With Uddhav Thackrey
Dhule news: शिंदे गटाचे मनोज मोरे म्हणतात, फुकटचे क्रेडीट घेऊ नका!

यावेळी खासदार अरविंद सावंत, उपनेते बबनराव घोलप, उपजिल्हा प्रमुख दीपक खुळे, तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर गाडे व शिवसैनिक उपस्थित होते.

Bharat Kokate With Uddhav Thackrey
Congress: देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात संघाचे योगदान किती?

सिन्नर तालुक्याच्या पूर्व व पश्चिम भागातील कार्यकर्ते शिवसेनेत सामील करून माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी शिवसेनेप्रति निष्ठेची साथ दिली. एकीकडे सदस्य नोंदणीला वाढता प्रतिसाद आणि दुसरीकडे पक्षामध्ये होत असलेल्या प्रवेशामुळे शिवसेनेची ताकद वाढणार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आत्मविश्वासही वाढत असल्याचे कोकाटे व पवार यांच्या प्रवेशादरम्यान दिसून आले.

सुमारे अडीचशे ते तीनशे कार्यकर्त्यांनी घोषणा देत, वाहनांचा ताफा घेऊन सोमवारी सकाळी मुंबईकडे प्रस्थान केले. मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारत कोकाटे व डॉ. रवींद्र पवार यांच्या हातात शिवबंधन बांधले. तसेच कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. कार्यकर्त्यांनी घोषणांनी मातोश्री दुमदुमून टाकली.

पक्षप्रमुख ठाकरे म्हणाले, की सिन्नर तालुक्यावर शिवसेनेचे पूर्वीपासूनच प्रेम आहे. शिवसैनिकांवर माझा विश्वास असून, येथून पुढची प्रत्येक लढाई आपल्याला जिंकायची आहे आणि तेही मर्दासारखी. त्यांनी बंडखोर आमदांवर टीका केली. प्रतिज्ञापत्र एवढी झाली पाहिजे की, भविष्यात शिवसेनेच्या नांदी लागण्याची कोणाची हिंमत झाली नाही. शिवसेनेचा भगवा कुणालाही हिसकावू देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यकर्त्यांचा उत्साह बघून शिवसेना सदैव शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या मागे राहिलेली आहे. जनसामान्यांचा प्रश्न सतत सोडविण्यात शिवसेना अग्रेसर असल्याचे त्यांनी सांगितले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com