Kiran Lahamate Won Election : अजितदादांचा शिलेदार लहामटेंनी पवारसाहेबांच्या भांगरेंना रोखलं; अकोल्याचा गड जिंकला

Kiran Lahamate Won Akole Assembly Election 2024 final result : अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार किरण लहामटे, भाजपचे माजी आमदार वैभव पिचड आणि एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाचे अमित भांगरे यांच्यात तिरंगी लढत झाली.
Kiran Lahamate
Kiran LahamateSarkarnama
Published on
Updated on

Akole Assembly Election 2024 final result : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आमदार किरण लहामटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमित भांगरे यांना पराभवाचा जोराचा धक्का दिला.

लहामटे यांनी 73 जार 958 मते मिळाली. तर अमित भांगरे यांना 68 हजार 402 मते मिळाली. पहिल्या फेरीपासून अमित भांगरे यांनी आघाडी घेतली होती. परंतु सहाव्या-सातव्या फेरीपासून त्यांचे मताधिक्य घटत जाऊन आमदार लहामटे यांचे मताधिक्यात वाढ होत गेली.

अमित भांगरे यांच्याकडून व्हीव्हीपॅटच्या मत मोजणीसाठी अर्ज दाखल केला होता. त्यानुसार लहीत बुद्रुक, तांभोळ, बहिरवाडी, ब्राम्हणवाडा, कौठे बुद्रुक या पाच मतदान (Vote) केंद्रांवरील स्लिप यांची मोजणी करण्यात आली. पण निकालात कोणताही फरक झाला नाही. यानंतर डॉ. किरण लहामटे यांना 5 हजार 556 मतांनी विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अनुपसिंह यादव यांनी घोषित केले.

Kiran Lahamate
Kashinath Date Won Election : अजितदादांच्या काशिनाथ दातेंकडून खासदार लंकेंना धोबीपछाड; राणी लंकेंचा पराभव

महाविकास आघाडीचे (MVA) अमित भांगरे 68 हजार 402, महायुतीचे डॉ.किरण लहामटे 73 हजार 958, अपक्ष वैभव पिचड 32 हजार 783, मारुती मेंगाळ 10 हजार 830, मधुकर तळपाडे 1 हजार 747, पांडुरंग पथवे 2 हजार 797, भिवा घाणे 446, किसन पथवे 387, विलास घोडे यांना 1457 मते मिळाली आहेत. 2 हजार 606 मतदारांनी नोटाला मतदान केले आहे.

Kiran Lahamate
Rohit Pawar Won Election : भाजपच्या राम शिंदेंनी रोहित पवारांना विजयासाठी झुंजवलं; पण...

अहिल्यानगर जिल्ह्यातील आदिवासी मतदारसंघापैकी एक ओळखा जाणारा अकोले विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात लढत झाली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आमदार किरण लहामटे यांनी अजितदादांना झुकते माप दिले. महायुतीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून किरण लहामटे विद्यमान आमदार असल्याने त्यांना आपसुक उमेदवारी मिळाली. परंतु यावेळी भाजपचे नेते माजी आमदार वैभव पिचड यांची कोंडी झाली.

पिचडांची बंडखोरी

भाजपचे माजी आमदार वैभव पिचड यांनी बंडखोरीची तयारी केली होती. कार्यकर्त्यांच्या बैठका आणि मेळावा देखील झाले होते. परंतु ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकरराव पिचड यांना ब्रेक स्ट्रोक बसला. यातून त्यांची प्रकृती ढासळली आणि त्यांना नाशिकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागले. यामुळे वैभव पिचड यांनी निवडणुकीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत वडिलांसाठी रुग्णालयात तळ ठोकला. यामुळे कार्यकर्ते अस्वस्थ झाले. शेवटी कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत त्यांच्या उमेदवारीचा अर्ज परस्पर भरला. कार्यकर्त्यांच्या आग्रहापुढे वैभव पिचड यांनी देखील उमेदवारी अर्जावर सही केली. परंतु वैभव पिचड यांना प्रचारात शेवटपर्यंत सहभागी होता आले नाही. याच दरम्यान, निवडणुकीचे वारे सुरू होताच पिचड पिता-पुत्रांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची चर्चा होती. परंतु ज्येष्ठ नेते पिचड यांनी या भेटीचे खंडण केले. विशेष म्हणजे, भाजपने राज्यातील बंडखोरांवर कारवाई केली असली, तरी वैभव पिचड यांच्यावर कारवाई केली नाही.

भांगरेंविषयी सहानुभूतीची लाट

दिवंगत नेते अशोक भांगरे यांनी अकोले मतदारसंघातून तब्बल सहा वेळा विधानसभा निवडणूक लढवली. परंतु त्यांचे आमदारकीचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. या मतदारसंघात भांगरे आणि मधुकरराव पिचड यांच्यात संघर्ष कायम राहिला. अशोक भांगरे यांनी अनेक पक्ष बदलले. परंतु त्यांनी शरद पवार यांच्या कुटुंबाशी असलेली नाळ तुटू दिली नाही.2019 मध्ये मतदारसंघात अशोक भांगरे यांची हवा होती. परंतु देशात नरेंद्र मोदी यांची हवा होती. यामुळे शरद पवार यांनी भाजपविरोधात एकास एक उमेदवार देण्याचा निर्णय घेत, अशोक भांगरे यांना थांबण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार भांगरे थांबले आणि किरण लहामटे यांना उमेदवारीची संधी मिळाली.

लहामटेंची दमछाक

यानंतर 2024मध्ये अशोक भांगरे प्रबळ उमेदवार मानले जात होते. परंतु त्यांचे 12जानेवारी 2023मध्ये निधन झाले. शरद पवार यांनी आता त्यांचे चिरंजीव तिसीमधील अमित भांगरे यांना उमेदवारी दिली आहे. अमित भांगरे यांनी देखील आमदार किरण लहामटे यांच्यासमोर चांगले आव्हान उभं केले होते. अमित भांगरे यांच्या झंझावातासमोर आमदार लहामटे यांची चांगलीच दमछाक झाली होती.

2024 मधील उमेदवार

पांडुरंग नानासाहेब पाठावे (RSPS), भिवा रामा घाने (JHJBRP), डॉ. किरण यमाजी लहामटे (NCP), अमित अशोक भांगरे(NCPSP), किसन विष्णु पाठावे (अपक्ष), विलास धोंडीबा घोडे (अपक्ष), अमित अशोक भांगरे (अपक्ष), मधुकर शंकर तळपदे (अपक्ष), वैभव मधुकरराव पिचड (अपक्ष) आणि मारुती देवराम मेंगल (अपक्ष)

2019 आणि 2014 राजकीय परिस्थिती

अकोले विधानसभा मतदारसंघात 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच्या (NCP) किरण लहामटे यांनी 1 लाख 13 हजार 411 मते मिळवली. दुसऱ्या क्रमांकावर भाजपचे वैभव पिचड होते. त्यांना 55 हजार 725 मते मिळाली होती. 2019 मध्ये शिवसेना एकसंघ होती आणि ती महायुती (भाजप, शिवसेना, आरपीआय) मध्ये होती. परंतु या वेळी राजकीय समीकरणे बदलली आहेत. 2014 मध्ये अकोले विधानसभा मतदारसंघावर एनसीपीचे वैभव पिचड निवडणुकीत होते आणि त्यांनी 67 हजार 696 मते मिळवून विजय मिळवला होता. दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनेचे मधुकर शंकर तलपडे होते, ज्यांना 47 हजार 634 मते मिळाली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com