Tribal Politics: भाजपच्या आनंदात मिठाचा खडा; आदिवासींनी रोखला गुजरातचा मार्ग, काय आहे प्रकरण?

BJP setback due to tribal movement in Nashik: महापालिका निवडणुकीतील यशाचा आनंद घेणाऱ्या भाजपच्या सरकारला आदिवासींनी पुन्हा दिला दणका.
Trible agitation J. P. Gavit
Trible agitation J. P. GavitSarkarnama
Published on
Updated on

Adivasi Protest Blocks Gujarat Route: आदिवासींच्या वनजमिनींचा प्रश्न पुन्हा एकदा चिघळला आहे. दोन वेळा आश्वासन देऊ नाही सरकारने वेळ काढू पणा केला. त्यामुळे या प्रश्नावर पुन्हा एकदा आदिवासींनी सरकारचे नाक दाबले आहे.

किसान सभेतर्फे दोन वेळा मुंबईला लॉंग मार्च काढण्यात आला. या लॉंग मार्चमुळे मुंबई शहराची व्यवस्था ठप्प झाली होती. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते.

राज्यातील आदिवासींच्या अतिक्रमित वनजमिनींचा प्रश्न सोडविण्यासाठी दोन वेळा लॉन्ग मार्च काढण्यात आला. दोन वेळा शासनाने आश्वासन दिले. मात्र मागण्यांबाबत ठोस निर्णय न झाल्याने महाराष्ट्र राज्य किसान सभा संतप्त आहे.

Trible agitation J. P. Gavit
Malegaon Politics: एका दगडात दोन पक्षी! आसिफ शेखांचा मास्टरस्ट्रोक; हिंदुत्ववादी राजकारणाची थेट कोंडी

या पार्श्वभूमीवर वनजमिनी आणि आदिवासींच्या अन्य प्रश्नावर पुन्हा एकदा किसान सभा आक्रमक झाली आहे. माजी आमदार जे. पी. गावित यांच्या नेतृत्वाखाली दोन दिवसांपासून पेठ रस्ता ठप्प केला आहे. या आंदोलनामुळे नाशिक आणि गुजरातचा संपर्क खंडित झाला. रास्ता रोको मुळे हजारो वाहने अडकून पडली आहेत.

Trible agitation J. P. Gavit
Raj Thackeray Politics: मतपेटीत हरला, जनतेत भारी! मेळाव्याला तुफान गर्दी ठाकरेंच्या शिलेदाराचा इशारा- ‘खरा नगरसेवक मीच!’

महापालिका निवडणुकांमध्ये भाजपला मोठे यश मिळाले. या यशाच्या आनंदात रमलेल्या भाजपची झोप या आंदोलनाने उडाली आहे. सत्ताधारी महायुती सरकारच्या आनंदात पुन्हा एकदा आदिवासी प्रश्नावरून मिठाचा खडा पडला आहे.

आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांची सोमवारी चर्चा केली. रविवारपासून सुरू झालेल्या आंदोलनाची तीव्रता सोमवारी आणखी वाढली. सोमवारी दिंडोरी सह देवळा आणि अन्यत्र रस्ता अडविण्यात आला.

यासंदर्भात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तातडीने संबंधितांची संपर्क करून परिस्थिती सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. पोलीसही आंदोलन स्थळी दाखल झाले आहेत. मात्र तोडगा निघत नसल्याने गुजरातला जाणारे आणि गुजरातून येणारे सर्व वाहने रस्त्यावर अडकून पडले आहे.

राज्य शासनाने या प्रश्नावर लॉन्ग मार्च काढला असता प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ठोस उपाययोजना झालेली नाही. आदिवासींचे प्रश्न आणखी बिकट झाले आहेत. त्यामुळे जोपर्यंत वनजमिनी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह आश्रम शाळांच्या आदिवासी रिक्त पदे भरली जात नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा ठाम निर्धार माजी आमदार गावित यांनी व्यक्त केला आहे.

तीन दिवसांपासून हे आंदोलन चिघळले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील व्यवस्था आणि वाहतूक ठप्प पडली आहे. राज्य सरकारचे नाक किसान सभेने दाबल्याने प्रशासन हतबल झाल्याचे चित्र आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com