Kishor Patil Politics: शिंदेंच्या शिलेदाराचे गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप; म्हणाले, ‘भाजपमध्ये विरोधकांना घेऊन त्यांनी माझ्या अंत्यसंस्काराची तयारीच केली होती...’

Kishor Patil Shriya saligations BJP wants my political funeral sending their means is BJP strategy-जळगावच्या महायुतीच्या राजकारणात शिवसेना एकनाथ शिंदे आणि भाजपच्या नेत्यांमधील आरोप प्रत्यारोप शिगेला
Kishor Patil & Girish Mahajan
Kishor Patil & Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Kishor Patil Vs BJP news: महायुतीतील जिल्हा परिषद निवडणुकीतील राजकीय वाद आता शिगेला पोहोचला आहे. आमदार किशोर पाटील यांनी भाजपच्या नेत्यांवर गंभीर आरोप केला. त्यामुळे नव्यावादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत.

पाचोरा भडगाव मतदार संघ जळगाव जिल्ह्यात केंद्रस्थानी आला आहे. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार किशोर पाटील यांनी येथे स्वबळाची घोषणा केली आहे. त्यांनी भाजपला थेट आव्हान दिले.

आमदार किशोर पाटील यांच्या आव्हानामुळे भाजपच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. त्यातूनच भाजपने आमदार किशोर पाटील यांच्यावर आरोप केले. मतदारसंघात भाजप सर्वच्या सर्व जागा स्वबळावर जिंकेल असे आव्हान जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आमदार पाटील यांना दिले.

Kishor Patil & Girish Mahajan
Prakash Londhe Crime: केंद्रीय मंत्र्यांच्या पक्षाचा अध्यक्ष दहा वर्षे खंडणी वसुलायचा, आकडा ऐकूण पोलिसही चक्रावले!

या पार्श्वभूमीवर आमदार पाटील यांनी भाजपच्या नेत्यांवर पुन्हा एकदा हल्ला चढवला आहे. त्यांनी भाजपची शिवसेनेला संपविण्याची स्ट्रॅटेजीच सांगून टाकली. भाजप हा विरोधकांना कारस्थान करून संपवतो असे ते म्हणाले.

Kishor Patil & Girish Mahajan
NCP Politics : अजितदादांच्या राष्ट्रवादीत चाललंय काय? आमदार संग्राम जगतापांची हिंदुत्ववादी भूमिका तर प्रतिभा शिंदे वक्फ बोर्ड बचाव आंदोलनात!

जलसंपदा मंत्री महाजन यांच्या धोरणावर त्यांनी टीका केली. कोणीही आला, कसाही आला, तरी त्याला भाजपमध्ये घ्या. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या वॉशिंग मशीनमध्ये सगळे नेते स्वच्छ होतात, अशी त्यांची अपेक्षा असते.

एका बाजूला माझ्या पाचोरा-भडगाव मतदारसंघातील माझ्या विरोधात निवडणूक लढविलेल्या सर्वांना त्यांनी भाजप पक्षात प्रवेश दिला. आता मतदारसंघात माझे सर्व विरोधक भाजपमध्ये आहेत. याचा अर्थ ते माझ्या उद्याच्या अंत्यविधीचीच तयारी करीत आहेत. अशावेळी मी गाफील राहून चालणार नाही.

भाजप नेत्यांचे विरोधकांना संपवण्याचे पद्धतशीर धोरण असते. जिथे शिवसेनेचा अथवा मित्र पक्षाचा आमदार असेल तिथे ते धोरण राबवतात. त्या ठिकाणी भाजप नेते गोड बोलून आपली माणसे घुसवतात. मित्र पक्षाच्या ताकदीवर त्यांना मोठे केले जाते.

मित्र पक्षाच्या कार्यक्षेत्रात भाजपची ताकद वाढविणे हा त्यांचा हेतू असतो. अशाप्रकारे भाजपची ताकद वाढली की भविष्यात मित्र पक्षालाच खतम करायचे ही भाजपची रणनीती आहे. त्यामुळेच शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे पदाधिकारी सावध आहेत. त्यांच्या या धोरणाला अजिबात बळी पडणार नाही. कोणत्याही परिस्थितीत भाजपशी युती नाही म्हणजे नाही या भूमिकेवर आम्ही ठाम राहू

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com