Kishor Patil : आमदार किशोर पाटील करतात तरी काय? संपत्तीत ४५ कोटींची वाढ!

Kishor Patil Wealth Increase 45 Crore: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप वाघ शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्यावर भडकले.
Vaishali Suryawanshi, MLA Kishor Patil & Ex MLA Dilip Wagh
Vaishali Suryawanshi, MLA Kishor Patil & Ex MLA Dilip WaghSarkarnama
Published on
Updated on

Pachora Assembly Constituency: पाचोरा मतदारसंघात यंदाही सर्वपक्षीय बंडखोर मैदानात उतरले आहेत. या बंडखोरांविरुद्ध आमदार किशोर पाटील यांनी नाम साधर्म्य असलेले उमेदवार मैदानात उतरवले आहेत. आमदार पाटील यांचे विरोधक चांगलेच भडकले.

पाचोरा मतदार संघात दर निवडणुकीत विविध पक्षांचे बंडखोर मैदानात उतरत असतात. या बंडखोरांमुळे निवडणूक चुरशीची होते. गेल्या निवडणुकीत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार किशोर पाटील निसटत्या मतांनी विजयी झाले होते. त्यात माजी आमदार दिलीप वाघ यांचा मुख्य वाटा होता.

यंदा आमदार पाटील यांची वाट अवघड करण्यासाठी सर्वपक्षीय बंडखोर मैदानात उतरले आहेत. त्यात देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार दिलीप वाघ आहेत. त्यामुळे आमदार पाटील सावध झाले आहेत.

या बंडखोरांना उत्तर देण्यासाठी आमदार पाटील यांनी नाम साधर्म्य असलेले उमेदवार दिले आहेत. त्यामुळे आमदार पाटील विरोधकांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सबंध शासकीय यंत्रणा आमदार पाटील यांच्यासाठी काम करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

Vaishali Suryawanshi, MLA Kishor Patil & Ex MLA Dilip Wagh
Maharashtra Election: भाजप, काँग्रेस बंडखोरीने घायाळ, खानदेशात ३५ पैकी १९ मतदारसंघात बंडखोरीचे पिक!

यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे प्रतिस्पर्धी उमेदवारांनी जाहीर केले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आमदार किशोर पाटील यांच्या भगिनी वैशाली सूर्यवंशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय भारतीय जनता पक्षाचे तालुकाप्रमुख अमोल शिंदे, भाजप नेते डॉ निळकंठ पाटील आणि डॉ उत्तम महाजन हे तीन बंडखोर आमदार पाटील यांना आव्हान देत आहेत.

याशिवाय शिवसेनेचे प्रताप हरी पाटील, काँग्रेसचे सचिन सोमवंशी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार दिलीप वाघ हे प्रबळ बंडखोर उमेदवार मैदानात आहे. जवळपास प्रत्येक पक्षाचे बंडखोर असून सहकारी भाजपचे चक्क तीन बंडखोर आहेत. हा आमदार पाटील यांच्यासाठी चिंतेचा विषय़ आहे.

माजी आमदार वाघ यांनी आमदार किशोर पाटील यांच्याकडून अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या काही वेळेत नाम साधर्म्य असलेले उमेदवार मैदानात उतरवण्यात आले. आमदार पाटील यांचा आत्मविश्वास संपुष्टात आला असून त्यांना पराभव दिसू लागल्याचे ही चिन्हे आहेत.

Vaishali Suryawanshi, MLA Kishor Patil & Ex MLA Dilip Wagh
Transgender Candidate: 'ग्रेस' यांच्यावर पीएच.डी. करणाऱ्या तृतीयपंथी निवडणुकीच्या रिंगणात; बड्या नेत्यांच्या मुलांना दिले चॅलेंज

या उमेदवारांना शासकीय वाहनातून आमदारांच्या घरी सोडण्यात आले. यावरून हे कारस्थान कोण करते? हे स्पष्ट आहे. आमदार पाटील विकासाच्या प्रश्नावर निवडणूक लढवीत असल्याचा दावा करतात, मग हे प्रकार त्यांना योग्य वाटतात का.

आमदार पाटील यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षात ४५ कोटींची वाढ झाली आहे. एवढी वाढ होणारा कोणता व्यवसाय ते करतात. हे त्यांनी जाहीर करावे, असे आव्हान माजी आमदार वाघ यांनी दिले.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वैशाली सूर्यवंशी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार पाटील आणि भारतीय जनता पक्षाचे नेते माजी आमदार दिलीप वाघ यांच्यात तिरंगी लढत होत आहे. अन्य बंडखोर आमदार त्यात आणखीच चुरस आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे पाचोरा मतदारसंघाची निवडणूक चांगलीच रंगण्याची चिन्हे पुन्हा एकदा दिसू लागली आहेत. यामध्ये मत विभागणी आणि आरोप प्रत्यारोप यातून आमदार होण्यासाठी कोणाला लॉटरी लागते याची चर्चा होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com