NCP News : सिन्नरची शिवसेना कोणती? ठाकरेंची की शिंदेंची?

राष्ट्रवादीचे बाळासाहेब वाघ यांनी प्रवेश केला नसेल तर पक्षाची काहीच हरकत नाही
Kondaji mama Avhad & Rajabhau Waje
Kondaji mama Avhad & Rajabhau WajeSarkarnama
Published on
Updated on

Sinner APMC politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांनी पॅनेल म्हणून वाजेंना पाठींबा दिला असल्यास तो महाविकास आघाडीचा घटक आहे. मात्र त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असल्यास त्यांच्यावर कारवाई करू, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांनी सांगतिले. (Will Ncp take action against Taluka chief of party)

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) तालुका अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांनी काल (ता.२०) पक्षाचे आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना सोडून शिवसेनेचे (Shivsena) माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांच्या गटात दाखल झाले होते. त्यावरून सिन्नरचे (Sinnar) राजकारण पेटले आहे.

Kondaji mama Avhad & Rajabhau Waje
Sinnar APMC election News : माणिकराव कोकाटे विरूद्ध राजाभाऊ वाजे लढत!

या संदर्भात आमदार कोकाटे यांनी आज शहा येथे बाजार समिती निवडणुकीच्या प्रचाराचे नारळ वाढवले. त्यांनी गेलेल्यांचा विचार करायचा नाही. गेलेल्यांना शुभेच्छा, खरेतर त्यांनी अगोदरच जायला पाहिजे होते. त्यांनी येत्या दोन दिवसात राजीनामा न दिल्यास जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड हे त्यांना पदावरून बडतर्फ करतील असे म्हटले होते.

याबाबत जिल्हाध्यक्ष आव्हाड म्हणाले, श्री. वाघ यांनी पॅनल म्हणून वाजे यांच्याकडे गेले असतील तर आमची हरकत नाही. कारण शिवसेनेचा ठाकरे गट देखील महाविकास आघाडीचाच घटक आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही त्यांना परके समजत नाही. मात्र श्री. वाघ यांनी शिवसेनेत प्रवेश केला असल्यास त्यांनी स्वतःच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे. त्याबाबत आम्ही माहिती घेऊन योग्य निर्णय घेऊ.

Kondaji mama Avhad & Rajabhau Waje
Manmad APMC election : आमदार सुहास कांदे आणि ठाकरे गटात तुंबळ हाणामारी

श्री. आव्हाड यांनी यावेळी शिवसेनेच्या नेत्यावंर देखील टिका केली. ते म्हणाले. सिन्नरची शिवसेना नेमकी कोणाची?. उद्धव ठाकरे यांची की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हेच समजत नाही. तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्त्याचा हा गोंधळ आहे. हा गोंधळ नेत्यांनी दुर केला पाहिजे. कारण ते फोटो उद्धव ठाकरे यांचा लावतात. त्यांचे नेते फिरतात पालकमंत्री दादा भुसे यांच्या सोबत. कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलावतात. तीथे ठाकरेंचा फोटो देखील नसतो. त्यामुळे त्यांची शिवसेना नेमकी आहे तरी कोणाची? उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदे यांची.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com