Vivek Kolhe assembly election : 'गणेश'चा विजय अन् 2024 थांबावं लागलं; कोल्हे माय-लेकरांचा कठीण निर्णय, पण थेट केंद्रात...

Snehalata Kolhe and Vivek Kolhe React on Not Contesting Assembly Election 2024 Kopargaon BJP News : विधानसभा 2024 ची निवडणूक न लढता भाजप पक्षात अहिल्यानगरमध्ये केंद्रस्थानी कोल्हे परिवार कसा आला, यावर स्नेहलता कोल्हेंनी सरकारनामाशी बोलताना मत मांडलं.
Snehalata kolhe and Vivek kolhe
Snehalata kolhe and Vivek kolheSarkarnama
Published on
Updated on

Kopargaon politics news : गणेश सहकारी कारखान्यात तत्कालीन महसूल मंत्र्यांना विवेक कोल्हे यांनी पराभवाचा धक्का दिला होता. यातून विवेक कोल्हे यांची राज्यभरात चर्चा झाली. लोकसभेला वेगळं वारं वाहिलं. यातच विधानसभा निवडणुकीत देखील विवेक कोल्हे मैदान मारणार, अशी चर्चा होती. तत्पूर्वी शिक्षक नाशिक मतदार संघात विवेक कोल्हेंनी राजकीय ताकदीची चुणूक दाखवली होती.

पण 2024च्या विधानसभा निवडणुकीला थांबवा लागलं. कठीण निर्णय होता. पण या निर्णयामुळे भाजपमध्ये अहिल्यानगर जिल्ह्याच्या केंद्रस्थानी आलेला कोल्हे परिवार पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या थेट संपर्कात आला. यामुळे आगामी राजकारणात भाजपकडून विवेक कोल्हेंना मिळणाऱ्या संधीची उत्सुकता वाढली आहे.

कोपरगावमधील (Kopargaon) भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि त्यांचे पुत्र युवा नेते विवेक कोल्हे यांनी 'सकाळ माध्यम समूहा'च्या 'सरकारनामा'शी गप्पा मारल्या. यात गणेश सहकारी साखर कारखान्यातील विजय आणि त्यानंतर 2024मध्ये विधानसभा निवडणुकीत महायुती म्हणून थांबण्याचा घेतलेला निर्णय यावर, दोघा माय-लेकानं भाष्य केलं.

स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, "महिला म्हणून काम करताना, माझ्यावर पक्षाने प्रचंड विश्वास टाकला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह पक्षाचे नेतृत्व करणाऱ्यांना ताई काम करत आहे, मन लावून काम करत आहेत आणि जीव ओतून काम करत आहेत, यावर लक्ष होते. कोल्हे परिवार राजकारणापेक्षा सामाजिक बांधिलकी जपणारा आहे. सत्ता असो अगर नसो, पण सतत लोकांशी आमची नाळ जोडलेली आहे आणि म्हणून हा परिवार आपल्यासोबत राहावा, अशी पक्षश्रेष्ठींचा पहिल्यापासून धारणा होती आणि आहे."

Snehalata kolhe and Vivek kolhe
Ram Shinde Rajendra Phalke meeting : शरद पवारांच्या शिलेदाराच्या घरी राम शिंदेंचा फराळ; बरचं राजकारण शिजलं?

'यातच विवेकभैय्यांनी 'गणेश'ची निवडणूक जिंकली. यामुळे राज्यभरातील युवक त्यांच्याकडे आकर्षित झाला. ते चर्चेत आले. कोण युवक आहे की, जो महसूलमंत्र्यांच्या ताब्यात असलेल्या कारखाना त्यांनी लढून घेतला, जिंकला, म्हणून एक वेगळं आकर्षण त्यांच्याबद्दल निर्माण झाले. पक्षीय नेतृत्वानं देखील याची दखल घेतली,' याकडे स्नेहलता कोल्हे यांनी लक्ष वेधलं.

Snehalata kolhe and Vivek kolhe
Tukaram Munde : तुकाराम मुंढेंचा धडाकेबाज निर्णय, 'त्या' संस्थांना नोंदणी अनिवार्य, एसओपी तयार!

'विवेकभैय्यांच्या या दमदार कामगिरीनंतर त्यांना राज्यभरातून संपर्क सुरू झाला. काही पक्षांकडून थेट आॅफर आल्या. आमच्याकडून पुढची विधानसभा लढा. कोपरगाव मतदारसंघात लढू शकता, शिर्डीमध्ये लढू शकता. जो मतदारसंघ पाहिजे, तो निवडा, पण आमच्याकडून लढा,' असा आग्रह करणारे संपर्क झाल्याची माहिती स्नेहलतांनी दिली.

परंतु भाजपचे पण एक म्हणणे होतं की, आम्ही आपल्याला न्याय देऊ आणि तुम्ही पक्षात रहावं आणि म्हणून तो अतिशय कठीण, असा निर्णय होता. कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन थांबवावं लागणार होतं, कारण कार्यकर्त्यांचा एक उत्साह असतो. आपला नेता विशेषतः युवकांचा विवेकभैय्यांच्या बाबतीत खूप उत्साह होता. त्यामुळे कठीण निर्णयाला समोरे जाताना खूप दडपण होते, हे सांगताना स्नेहलता कोल्हेंना काहीसं गहिवरून आलं.

कार्यकर्त्यांना समजावून सांगणं कठीण

पण निर्णय घेतला! कठीण काळ होता. आम्हाला थोडं कठीणच गेलं. कार्यकर्त्यांना समजावून सांगणं. पक्षात रहायचं ठरवलं. आपल्याला योग्य तो न्याय पक्षाकडून दिला जाणार आहे आणि त्या माध्यमातून आपले सगळे प्रश्न आपल्याला सोडवता येणार आहे, हे कार्यकर्त्यांना समजावून सांगितलं. हा कठीण निर्णय घेतला अन् थेट केंद्रात कोल्हे परिवार पोहोचल्याकडे स्नेहलता कोल्हे यांनी लक्ष वेधले.

अमित शहांकडून दखल...

या निर्णयची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यातून थेट केंद्रीय नेतृत्व अमित शहा यांनी घेतली. आता ते देखील आमच्याबरोबर आहेत, देशातील पहिला सहकारी तत्त्वावरील सीएनजी प्रकल्प अहिल्यानगरच्या कोपरगावात विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वात सुरू झाला आहे. लवकरच या कामाची पावती मिळाले, असा आशावाद स्नेहलता कोल्हे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com