Ram Shinde Rajendra Phalke meeting : शरद पवारांच्या शिलेदाराच्या घरी राम शिंदेंचा फराळ; बरचं राजकारण शिजलं?

Ram Shinde Visits NCP Leader Rajendra Phalke Home in Karjat : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या घरी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिवाळी फराळाला हजेरी लावली.
Ram Shinde Rajendra Phalke meeting
Ram Shinde Rajendra Phalke meetingSarkarnama
Published on
Updated on

BJP NCP leaders meeting Ahilyanagar : शरद पवार यांची 1984 पासून साथ देणारे, राजेंद्र फाळके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यानंतर लगेचच दिवाळी फराळाचं निमित्त साधत भाजपचे विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी त्यांची घरी भेट घेतली.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोघांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली. या चर्चेचा तपशील समोर न आल्यानं, राजकीच चर्चांना उधाण आलं आहे. राजेंद्र फाळके पुढं काय निर्णय घेतात, याकडे आता लक्ष लागलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांचे कट्टर समर्थक असलेले राजेंद्र फाळके यांनी 15 ऑक्टोबरला कौटुंबिक कारणास्तव जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. राजीनामा पत्रात त्यांनी कौटुंबिक कारण म्हटले असले, तरी त्यांचे आमदार रोहित पवार यांच्याशी असलेले वैयक्तिक संबंधाची वादाची झालर असल्याची चर्चा आहे.

राजेंद्र फाळके यांनी या राजीनाम्यावर अद्याप तरी माध्यमांसमोर भूमिका मांडलेली नाही. उलट मौन बाळगणं पसंद केलं. त्यामुळे राजीनाम्याविषयी उलट-सुलट चर्चांनी राजकीय वातावरण तापलं आहे. फाळके यांनी दिलेला राजीनामा आणि त्यांची पुढील राजकीय दिशा काय असणार आहे? याची उत्सुकता असतानाच विधान परिषदेचे सभापती आणि एकेकाळी दोन विधानसभा निवडणुकीत एकमेकांसमोर तगडे आव्हान निर्माण करणारे प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांनी अचानक राजेंद्र फाळके यांच्या कर्जतच्या निवासस्थानी दिवाळी फराळनिमित्त सदिच्छा भेट दिली.

Ram Shinde Rajendra Phalke meeting
Vote Chori : मतदार याद्यांतील घोळ मान्य म्हणत फडणवीसांनी काँग्रेसला घेरले; थेट इशारा देत म्हणाले, 'त्यांचे आमदार, खासदार...'

फाळके कुटुंबियांनी देखील सभापती प्रा. राम शिंदेंचा फेटा बांधत सन्मान केला. त्यांची सदिच्छा भेट असले, तरी आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीस राजकीय स्वरूप देखील प्राप्त झाले आहे. कारण जिल्हाध्यक्ष पदाच्या राजीनाम्यानंतर राजेंद्र फाळके यांनी आपली पुढील राजकीय दिशा काय असेल? याबाबत सूतोवाच आजमितीस देखील केलेले नाहीत.

Ram Shinde Rajendra Phalke meeting
Nilesh Ghaywal News: कुख्यात गुंड निलेश घायवळला सर्वात मोठा दणका; पासपोर्ट रद्द; पोलिसांना कारवाईसाठी 'फ्री हँड'

यात राम शिंदेंबरोबरची प्रदीर्घ चर्चा त्यांना भाजपमध्ये येण्याचे आमंत्रण होते की काय? या चर्चेने जिल्ह्यासह संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागले आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राम शिंदेंनी रोहित पवारांच्या अनेक शिलेदारांना आपल्याकडे खेचत त्यांना धोबीपछाड देत एकाकी पाडली होते. यात फाळकेंच्या रूपाने आणखी एक धक्का रोहित पवारांना देतात की काय? हे आगामी काळात पुढे येईल. फाळके यांचे स्थानिक पातळीवरील संघटन आणि राजकारणात असणारे मित्र परिवार ते दोन्ही तालुक्याच्या इतर नेत्यात उजवे ठरतात.

रोहित पवार यांचे मौन

राजेंद्र फाळके जिल्हाध्यक्ष पदावर असताना त्यांचे आणि आमदार रोहित पवार यांच्या राजकीय संबंधात फार गोडवा नव्हता. त्यात रोहित पवार यांच्या अनेक कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष असणारे फाळके बहुतांश ठिकाणी अनुपस्थितच राहत असे. नुकतेच राजेंद्र फाळके यांनी राजीनामा दिल्यानंतर रोहित पवार मतदारसंघात आले असताना यावर त्यांनी साधी प्रतिक्रिया देखील दिली नाही.

शिंदे अन् फाळकेमध्ये लढत

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ खुला झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीत प्रा. राम शिंदे आणि राजेंद्र फाळके हे दोन्ही नेते 2009 साली अपक्ष, तर 2014 साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर फाळके राम शिंदेंच्या विरोधात उभे राहिले होते. यासह 2024च्या निवडणुकीपूर्वी राम शिंदेंसोबत फाळके यांनी कर्जतमध्ये एका ठिकाणी 'चाय पे चर्चा' करीत खळबळ उडवली होती. त्यांनतर बुधवारी पुन्हा राम शिंदेंना घरी फराळ भरवत जिल्ह्यासह तालुक्यात सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com