Nashik Kumbh Mela : कुंभमेळा कामांमध्ये भ्रष्टाचार कराल तर तुरुंगात खडी फोडायला जाल, आयुक्त गेडामांचा ठेकेदारांना इशारा

Commissioner Pravin Gedam warning contractors : कुंभमेळा विकासकामांमध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी ठेकेदार व अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेत सूचना केल्या.
Pravin Gedam
Pravin Gedam Sarkarnama
Published on
Updated on

Nashik Kumbh Mela : नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा अवघ्या दीड वर्षांवर येऊन ठेपला आहे. जिल्हा प्रशासनाकडून त्यादृष्टीने तयारीला वेग आला आहे. कुंभमेळानिमित्त तब्बल 2240 कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होण्याची शक्यता आहे.

पंरतु कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्यास थेट तुरुंगवारी करावी लागेल असा इशारा ठेकेदार व अधिकाऱ्यांना सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष व विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिला आहे. त्यांनी थेट यासंदर्भातील शासनाचे आदेशच वाचून दाखवले. बुधवारी (ता. 1) सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदारांची बैठक घेऊन डॉ. गेडाम यांनी निविदेतील अटी-शर्ती स्पष्ट केल्या.

कुंभमेळ्याच्या कामांमध्ये ठेकेदारांची संगनमताने रिंग होऊन तक्रारी शासनाकडे मोठ्या प्रमाणात पोहोचल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकारची बदनामी होत आहे. त्यामुळे कुंभमेळ्याच्या विकासकामांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी कामाच्या गुणवत्तेबाबत काटेकोर सूचना विभागीय आयुक्त गेडाम यांनी केल्या. आयुक्तांनी गुणवत्तापूर्ण कामे न झाल्यास कोणती कारवाई होईल, याची माहित वाचून दाखवली.

Pravin Gedam
Mangesh Chavan Politics : आमदार मंगेश चव्हाण यांना भाजप नेत्यांकडूनच दणका! थेट फडणवीसांकडे वाचला तक्रारींचा पाढा!

कामात कोणतीही टाळाटाळ करू नका, विशेषतः रस्त्यांची कामे करताना चांगल्या दर्जाचे मटेरियल वापरा. याशिवाय डांबर व खडी किती वापरायची त्याचे किती थर द्यायचे याबाबतचे नियम समजावून सांगितले. प्रत्येक गाडीला व यंत्रसामग्रीला जीपीएस ट्रॅकर बसवणे, रोडरोलर व अन्य उपकरणांचा तपशील जीपीएसद्वारे तपासणे, तसेच प्रत्येक टप्प्याची नोंद वहीत ठेवणे, अशा सूचना अधिकाऱ्यांना व ठेकेदारांना देण्यात आल्या.

Pravin Gedam
Devendra Fadnavis: अखेर भाजपचे आमदार हक्कासाठी एकवटले, थेट मुख्यमंत्र्यांकडेच केले गाऱ्हाने!

नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे करण्यात येणाऱ्या कामांचे तीन टप्प्यांत व्हिडीओ काढण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले. तीन वेळा कामाची सद्यःस्थिती दर्शविणारा व्हिडीओ काढावा. सदरचे तीन टप्पे म्हणजे संबंधित काम भौतिकदृष्ट्या साधारणतः 25 टक्के, 50 टक्के आणि 55 टक्के या टप्प्यांपर्यंत आल्यावर किंवा कामाच्या कालावधीच्या दरम्यान असावे. काम पूर्ण झाल्यावर देखील व्हिडीओ काढावा अशा सूचना देण्यात आल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com