Kumbh Mela Politics : पैशाने भूक भागत नाही! 'माती'च्या बदल्यात 'माती'च हवी! रिंग रोडसाठी शेतकऱ्यांनी सरकारला ठणकावलं

Nashik Ring Road नाशिकमध्ये होणारा आगामी सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित रिंगरोडच्या भूसंपादनावरुन वाद निर्माण झाला असून काही शेतकऱ्यांचा त्याला विरोध आहे.
Nashik Ring Road
Nashik Ring RoadSarkarnama
Published on
Updated on

Kumbh Mela News : सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर आला आहे. अशातच विकास कामे केव्हा पूर्ण होणार या चिंतेने प्रशासन त्रस्त आहे. यामध्ये भूसंपादनाचा विषय चांगलाच तापला आहे.

गेल्या आठवड्यात भूसंपादनासाठी पोलिसांनी बळाचा वापर केल्याने वाद झाला. उपविभागीय अधिकारी दत्ता यांच्या विरोधात मोठे आंदोलन झाले होते. महिलांना मारहाण केल्याने प्रकरण अद्याप शांत झालेले नाही.

त्याच रिंग रोडच्या भूसंपादनावरून आता नवा वाद उभा राहिला आहे. कुंभमेळा परिक्रमा मार्गाला काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुद्रांक शुल्क सवलत मंजूर झाली. मात्र जमिनींचे शासनाचे दर अत्यंत कमी असल्याची तक्रार आहे.

नाशिकच्या शहरी भागात यापूर्वी रिंग रोड नियोजित होता. कुंभमेळ्यासाठी आखण्यात आलेला रिंग रोड नव्या भागातून गेल्याने वाद आहे. या भागात शहरातील द्राक्ष बागा आणि महागड्या जमिनी आहेत.

Nashik Ring Road
Nashik Ring Road : नाशिकच्या शेतकऱ्यांना धक्का ; 66 किमी रिंगरोडसाठी भूसंपादन सुरूच राहणार, उच्च न्यायालयाचा निर्णय

या जमिनींना शासनाने नऊ लाख रुपये प्रति एकर हा दर निश्चित केला आहे. त्याच्या चार ते पाचपट दर देण्याची शासनाची तयारी आहे. मात्र या जमिनींना तीन ते साडेतीन कोटी रुपये प्रति एकर बाजार दर असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे.

या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते विनोद नाठे यांनी सोशल मीडियावर जोरदार पोस्ट व्हायरल केल्या आहेत. त्यात अनेक शेतकऱ्यांनी भाग घेतला. सरकारी दराने जमिनी मिळू शकत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला नको आहे. मिनीच्या बदल्यात जमीन हवी अशी भूमिका मांडली जात आहे.

Nashik Ring Road
Nashik Ring Road : कुंभमेळ्याचा महत्त्वाकांक्षी रिंगरोड प्रकल्प अडचणीत, ४० हून अधिक शेतकऱ्यांची हायकोर्टात धाव..

कुंभमेळ्याच्या 66.65 किलोमीटर लांबीच्या रिंग रोड साठी 7900 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यामध्ये 367 हेक्टर जमीन संपादित केली जाईल. यासाठी साडेतीन हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्याला शेतकऱ्यांचा विरोध असल्याने सत्ताधारी पक्षाचे आमदारही त्यापासून अंतर ठेवून आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन त्याला विरोध दर्शविला होता. शेतकरी आणि शिवसेनेच्या विरोधाने महिलांना मारहाण केल्याचा आरोप असलेले अधिकारी दत्ता बेपत्ता झाले होते. आता भूसंपादनाचा दर हा वादात सापडला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com