BJP Politics : 'गांधी घराण्याच्या जवळचं घराणं फोडण्यात भाजप यशस्वी झाल्यास? मग काय धुळ्यातून कॉंग्रेस गायबच होणार..

Kunal Patil, known for his loyalty to the Gandhi family, is rumored to join BJP : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने विरोधी पक्षातील बडे नेते आपल्या गळाला लावण्यास सुरूवात केली आहे.
Kunal Patil Congress
Kunal Patil CongressSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने विरोधी पक्षातील बडे नेते आपल्या गळाला लावण्यास सुरूवात केली आहे. त्यात कॉंग्रेस नेत्यांचाही समावेश आहे. विधानसभा निवडणुकीनंतर अनेक काँग्रेस नेत्यांनी पक्षाची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यात आता भाजपने खान्देशमध्ये मोर्चा वळवला असून धुळे जिल्ह्यातील बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

धुळ्यातील काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील भाजपच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची कुणाल पाटील यांनी भेट घेतली आहे. या भेटीनंतर कुणाल पाटील यांचा शनिवारी (ता.28) भाजप प्रवेश ठरल्याची चर्चा आहे. पाटील यांच्यासह महाविकास आघाडीच्या अनेक नेते व पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश होणार असल्याची चर्चा माध्यमांवर सुरु आहे.

जसे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत, तसेच भाजपकडून राजकीय हालचाली अधिक गतिमान होताना दिसत आहेत. प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात विविध जिल्ह्यांतील विरोधी पक्षातील नेत्यांना भाजपच्या वाटेवर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या मोहिमेचा भाग म्हणून, काँग्रेसचे नेते कुणाल पाटील यांना पक्षात सामावून घेण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळते. जर हे प्रत्यक्षात उतरले, तर धुळ्यातील काँग्रेसच्या अस्तित्वालाच हा मोठा धक्का राहील.

Kunal Patil Congress
Maharashtra Politics : भाजपला लाल बावट्याची ताकद दाखवणार, डावे पक्ष एकवटले

धुळ्यात ग्रामीणध्ये कॉंग्रेसचे अस्तित्व हे मुळातच कुणाल पाटील यांच्यामुळे आहे. पाटील यांची ग्रामीणमध्ये मोठी ताकद आहे. त्यामुळे पाटील यांना गळाला लावल्यास धुळे ग्रामीणमधील कॉंग्रेसचे अस्तित्व पूर्णंता धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याचा मोठा फटका आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेस व महाविकास आघाडीला बसेल. याउलट भाजपला मोठा फायदा होईल.

कुणाल पाटील यांचं कुटुंब काँग्रेसशी निष्ठावान राहिलेलं घराणं म्हणून ओळखलं जातं. माजी आमदार असलेल्या कुणाल पाटील यांचं धुळे जिल्ह्यात तरुणांमध्ये आणि सामाजिक क्षेत्रात ठोस प्रभाव आहे. त्यांच्या वडिलांची – रोहिदास पाटील यांची – ओळख एका ठाम काँग्रेस विचारसरणीच्या नेत्याप्रमाणे होती. त्यांनी काँग्रेस सरकारमध्ये मंत्री म्हणून काम पाहिलं असून, अनेक खात्यांची धुरा त्यांनी समर्थपणे सांभाळली होती. गांधी कुटुंबीयांशी त्यांचे जवळचे संबंध होते. याचाच प्रत्यय राहुल गांधी यांच्या धुळे भेटीदरम्यान आला, जेव्हा त्यांनी विशेषतः रोहिदास पाटील यांची भेट घेतली होती.

Kunal Patil Congress
Kunal Patil News: शिवसेना उद्धव ठाकरे, काँग्रेसला धुळ्यात भाजप एकाच वेळी धक्का देण्याच्या तयारीत?

या पार्श्वभूमीवर काँग्रेसने ते माजी आमदार कुणाल पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपली भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांच्या समवेत बैठक झाली. मात्र खाजगी विषयावर ती बैठक होती. त्यात कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. माझा भाजप प्रवेशाच्या केवळ चर्चा असून त्यात काहीही तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com