लातूरला उद्यापासून तीन दिवस लावणी महोत्सवाची रंगत!

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने लातूर येथे २६ ते २८ मार्च दरम्यान लावणी महोत्सवाचे आयोजन
Amit Deshmukh
Amit DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : सांस्कृतिक (Cultural) क्षेत्राला उभारी देण्यासाठी महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख (Amit Deshmukh) यांच्या पूढाकारातून लातूरला (Latur) आणखी एक भेट मिळाली आहे. येत्या २६ ते २८ मार्च दरम्यान लातूर येथे सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने लावणी महोत्सव होणार आहे.

Amit Deshmukh
अनिता भामरे यांचा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावर दावा!

काही दिवसा पूर्वी सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने राज्यभरात नाटय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या नाटय स्पर्धेचे केंद्र लातूरला सुरू केल्यामूळे असंख्य नाटय कलावंतानी आपली कला येथे सादर केली. शिवाय येथील रसीकांनी नाटकांचा आनंद घेतला. सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या अभिनव कल्पनेतून आता आजादी का अमृत महोत्सवांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासनातर्फे राज्यभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम व महोत्सवांचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून लातूर येथे लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

Amit Deshmukh
धक्कादायक...सातपुड्यात विषारी दूधनिर्मिती कारखाना उघडकीस

लावणी ही महाराष्ट्रांची पारंपरिक लोककला असून आजही जनसामान्या आपली वाटते. शहरी भागापासून ते ग्रामीण भागापर्यंत लावणी फार मोठ्या प्रमाणात प्रसिध्द आहे. ग्रामीण भागातील रसिक प्रेक्षकांचे आजही या कलेच्या माध्यमातून मनोरंजन होत असते. आधुनिक युगात लोप पावत चाललेल्या लोककलांचे जतन व संवर्धन होण्याच्या दृष्टीने तसेच समृद्ध लोककलेला व लोककलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे दरवर्षी लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी २६ ते २८ मार्च या कालावधीत लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्व. दगडोजीराव देशमुख सांस्कृतिक सभागृहामध्ये लावणी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

या महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी (ता. २६) सायंकाळी सहाला होणार आहे. या महोत्सवात २६ मार्चला सविता जळगावकर आणि पार्टी (पुणे), न्यू अंबिका कलाकेंद्र आणि पार्टी चौफुला (पुणे), पद्मावती कलाकेंद्र आणि पार्टी मोडनींब (सोलापूर) हे संघ आपली कला सादर करतील. २७ मार्चला शीतल नागपूरकर आणि पार्टी चौफुला (पुणे), आशा रूपा परभणीकर आणि पार्टी मोडनीब (सोलापूर), उषा रेश्मा नर्लेकर आणि पार्टी (पुणे) यांच्या बहारदार लावण्याचा कार्यक्रम होईल.

२८ मार्चला नूतन कलाकेंद्र आणि पार्टी (इस्लामपुर), नीता काजल वडगावकार आणि पार्टी (सणसवाडी, पुणे), आशा वैशाली नगरकर आणि पार्टी (मोडनीब) यां संघाचा कार्यक्रम होईल. तीन दिवसांचा हा महोत्सव विनामूल्य आहे. जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक बिभीषण चवरे यांनी केले आहे.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com