Lawrence Bishnoi Political Link: भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना वादात असतात. नाशिकमध्ये त्यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत असाच एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. देशातील हिंदू समाजाचे अस्तित्व संकटात असल्याचे, यावेळी ते म्हणाले.
पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. २६ पर्यटकांची हत्या करण्यात आली. तसेच पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर अन्याय होत आहे. त्याच्या निषेधार्थ शहरातील सिडको येथे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली.
विशेष म्हणजे या सभेला शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांचे चिरंजीव दीपक बडगुजर उपस्थित होते. भाजपचे व्यंकटेश मोरे, राहुल आरोटे यांसह विविध पदाधिकाऱ्यांनी या सभेला हजेरी लावली. त्यामुळे देखील ही सभा चर्चेचा विषय ठरली.
या सभेत समर्थकांनी लॉरेन्स बिश्नोईचे फोटो झळकवले. मुंबईतील एका राजकीय नेत्याच्या हत्येसह विविध अभिनेते आणि व्यावसायिकांना खंडणीसाठी धमकी दिल्याचा आरोप असलेल्या लॉरेन्स बिश्नोई याच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत.
सध्या लॉरेन्स बिश्नोई कारागृहात आहे. कारागृहातून त्याच्या गुन्हेगारी कारवाया सुरू असतात, असे बोलले जाते. या विष्णॊईचे फोटो सिडको येथे झालेल्या सभेत झळकल्याने अनेकांचा या सभेचा नेमका संदेश काय? यावरून गोंधळ झाला.
यावेळी आमदार पडळकर यांनी हिंदू समाजाने सावध होण्याची आवश्यकता. देशातील हिंदू समाजाचे अस्तित्व संकटात आले आहे. पहलगाम येथे पर्यटकांवर झालेला हल्ला धर्म विचारून करण्यात आला. पश्चिम बंगालमध्ये राजरोस हिंदू समाजावर अत्याचार होत आहेत. मात्र हिंदू समाज अद्यापही जागा होत नाही, असे सांगितले.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध म्हणून ही सभा घेण्यात आली. मात्र सभेतील आक्रमक भाषणे आणि सत्ताधारी पक्षाकडूनच समाजाला चिथावणी देण्याचे प्रकार या सभेत घडले. सभेला मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात होता. आता कुख्यात गुन्हेगार लॉरेन्स बिश्नोई याचा फोटो लावून झालेल्या सभेचे काय पडसाद म्हणतात हा चर्चेचा विषय आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.