Vinod Tawde : नगर विधानसभा भाजप लढवणार, विनोद तावडेंचे संकेत; अजित पवार यांच्या गोठात अस्वस्थता

Vinod Tawde meeting for Nagar City Assembly seat : नगर शहर विधानसभेची जागा भाजपने लढवावी, यासाठी राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची नगर शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. विनोद तावडे यांनी सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे संकेत दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या गोठात अस्वस्थता पसरली.
Vinod Tawde
Vinod TawdeSarkarnama

Ahmednagar Politics News : लोकसभा निवडणुकीनंतर नगर शहरात भाजपमध्ये कुरबुरी वाढल्यात. नगर विधानसभेची जागा भाजपकडे घेण्यासाठी नगर शहरातील एका गटाने भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डावलत, थेट राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची भेट घेतली. ही भेट फडणवीस यांच्या जवळील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना खटकली आहे.

नगर भाजपमध्ये फडणवीस आणि तावडे, असे दोन गट पडताना दिसत असले, तरी या दोन्ही गटांचा नगर शहराची जागा भाजपला मिळावी, असा उद्देश आहे. भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते नगर शहराच्या जागेसाठी राष्ट्रीय नेत्यांकडे धाव घेत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांच्या गोठात अस्वस्थता पसरली आहे.

नगर शहर विधानसभेची जागा शिवेसना-भाजप युतीचा बालेकिल्ला राहिलेला आहे. युती तुटली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. लोकसभा निवडणुकीत नगर शहर विधानसभा मतदारसंघाची मते पाहिल्यास ती भाजप-शिवसेना एकनाथ शिंदे गट युतीच्या बाजूने आहेत

त्यामुळे भाजप-शिवसेना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट युतीचा उमेदवार इथं प्रभावी ठरू शकतो. त्यामुळे नगर शहर विधानसभेची जागा भाजपला मिळावी यासाठी नगर शहरातील भाजपच्या एका गटाने भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना थेट गळ घातली आहे. भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंत लोढा यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने विनोद तावडे यांची भेट घेतली.

Vinod Tawde
Sharad Pawar News : महायुतीसाठी धोक्याची घंटा; अजित पवार गटाचे आमदार शरद पवारांच्या संपर्कात?

विनोद तावडे यांच्याकडे लोकसभा निवडणुकीत पक्ष पातळीवर महाराष्ट्रात सर्वेक्षण आणि उमेदवारी निश्चितेची महत्त्वाची जबाबदारी होती. विधानसभा निवडणुकीत तीच जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली.

त्यामुळे जागा वाटपात आणि उमेदवार निश्चितीमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची असणार असल्याने त्यांची भेट घेतल्याचे वसंत लोढा यांनी सांगितले. या भेटीत नगर शहर विधानसभा मतदारसंघाची जागा भाजपकडे (BJP) घ्यावी याकरता करण्यात आलेले सर्वेक्षण आकडेवारी आणि गृहीतकांची मांडणी वसंत लोढा यांनी यावेळी तावडेंसमोर केली.

नगर शहरात पाच वेळा आमदार अनिल राठोड शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार म्हणून निवडून आले. नंतर झालेल्या राजकारणात शिवसेना-भाजप समोरासमोर लढली आणि मतांची फाटाफट झाली. यात राठोड यांचा पहिल्यांदा पराभव झाला.

त्यावेळी त्यांच्या विरोधात काँग्रेस होती. नंतर भाजप-शिवसेना एकत्र असताना देखील राष्ट्रवादीलाच विजय मिळाला. आता राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आहे. त्यामुळे नगर शहरातील विद्यमान आमदार संग्राम जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे आहेत.

Vinod Tawde
Nilesh Lanke Oath : करून दाखवलं..! इंग्रजीत शपथ घेतल्यानंतर नीलेश लंकेंची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रवादीला मताधिक्य नाही

राष्ट्रवादीच्या फुटीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे फारसे मताधिक्य राहिलेले नाही. लोकसभा निवडणुकीत ते सिद्ध देखील झाले आहेत. नगर शहर विधानसभा मतदारसंघात 2019 आणि 2024 या दोन्ही वेळी सुजय विखे यांना मोठे मताधिक्य मिळाले.

यावर्षी जरी मताधिक्य घटले असले, तरी ते कायम आहे. याचाच फायदा घेऊन या मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत कमळ चिन्ह फक्त लोकसभा निवडणुकीत चालले आता ते विधानसभा निवडणुकीत मतदारांना दिले, तर भाजपचा उमेदवार निश्चितपणे सर्वांना भारी ठरेल, असा दावा वसंत लोढा यांनी केला.

हिंदुत्व आणि भयमुक्तचा नारा

नगर शहर विधानसभेची जागा भाजपने आपल्याकडे घेऊन कमळ चिन्हावर लढवावी. आमदार अनिल राठोड यांनी नगर शहरात रुजवलेले हिंदुत्व आणि भयमुक्त नगरचा नारा याची गरज नगरकरांना आजही वाटते.

राठोड यांचे नाव प्रत्येक दुर्घटनेनंतर मतदार घेतात, अशाच नेतृत्वाची आवश्यकता नगरला आहे, असे मतदारांना वाटते. म्हणूनच वसंत लोढा यांनी ही जागा भाजपने लढवावी, असा आग्रह विनोद तावडे यांच्याकडे केले आहे. भाजपच्या शिष्टमंडळाच्या मागणीकडे विनोद तावडे आणि पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com