Ajit Pawar-NCP-Sharad Pawar
Ajit Pawar-NCP-Sharad PawarSarkarnama

Sharad Pawar News : महायुतीसाठी धोक्याची घंटा; अजित पवार गटाचे आमदार शरद पवारांच्या संपर्कात?

Ajit Pawar News : नाशिक जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघापैकी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने नऊ जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे महायुतीला येत्या काळात फटका बसण्याची शक्यता आहे.
Published on

Nashik News : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात फूट पाडून भाजपने शिंदे गटाच्या माध्यमातून राज्यात सत्ता स्थापन केली. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात 15 पैकी 13 आमदार सत्ताधारी गटाचे पाठीराखे आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना या ठिकाणहून मोठे लीड मिळाल्याने या सर्व आमदारांच्या जागा अडचणीत येण्याची शक्यता असून त्या ठिकाणच्या आमदाराच्या दृष्टीने हा धोक्याचा इशारा मानला जात आहे.

नाशिक जिल्ह्यात 15 विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये भाजपचे 5, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 6, काँग्रेस आणि 'एमआयएम'प्रत्येकी 1 आणि शिवसेना शिंदे गटाचे 2 आमदार आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने (MVA) 15 पैकी नऊ जागांवर आघाडी घेतली आहे. (Sharad Pawar News)

भाजपने (Bjp) आपल्या चार जागांवर वर्चस्व कायम ठेवले आहे. शिंदे गटाच्या दोन्ही आमदारांनी मतदारसंघात आघाडी घेतली आहे. हा कल लक्षात घेता अजित पवार गटाच्या सर्व आमदारांना धोक्याचा इशारा आहे. त्यामुळे हे सर्व आमदार सध्या अस्वस्थ आहेत.

मालेगाव मतदार संघातील काँग्रेसचे (Congress) माजी आमदार असिफ शेख यांनी सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. येथील 'एमआयएम'चे आमदार मौलाना मुफ्ती येत्या काही दिवसात काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता असल्याचे बोलले जाते. त्यामुळे येथील लढत ही काँग्रेस आणि मित्र पक्षातच होणार आहे.

Ajit Pawar-NCP-Sharad Pawar
Ajit Pawar Vs BJP : अजितदादांना महायुतीतून बाहेर काढा; फडणवीसांचे निकटवर्तीय भाजप पदाधिकाऱ्याचा हल्लाबोल

अजित पवार गटाच्या आमदारांच्या मतदारसंघात महाविकास आघाडीला लक्षणीय मते मिळाली आहेत. येथील स्थानिक प्रश्न आणि राजकीय समीकरणे देखील महाविकास आघाडीच्या बाजूने असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आगामी काळात अजित पवार गटात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुका जवळ येऊ लागल्याने सत्ताधारी आमदारांमधील अस्वस्था वाढली आहे. त्यामुळे विशेषत: महायुतीतील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्थान डळमळीत करणाऱ्या या घटना आहेत. त्यामुळे काही अजित पवार गटाचे आमदार शरद पवारांच्या (Sharad Pawar) संपर्कात असल्याची चर्चा जोरात आहे.

Ajit Pawar-NCP-Sharad Pawar
Navneet Rana News : ओवेसींची खासदारकी रद्द करा; थेट राष्ट्रपतींना नवनीत राणांनी लिहले पत्र

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com