Nilesh Lanke : नेत्यांचा आदेश आल्यास यशस्वी करणार; आमदार लंकेचे 'नगर दक्षिण' बाबत मोठे विधान

Ncp News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पक्षचिन्ह आणि आमदार अपात्रतेचा निकालावर आमदार लंके समाधानी
Nilesh Lanke, Sujay vikhe patil
Nilesh Lanke, Sujay vikhe patilSarkarnama
Published on
Updated on

Nagar News : महायुतीत असलेले राष्ट्रवादी अजित पवार यांचे आमदार नीलेश लंके नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान खासदार सुजय विखे यांना झटका देण्याच्या तयारीत असल्याचे दिसते. 'वरिष्ठांकडून आदेश आल्यास तो आदेश कार्यकर्ता म्हणून यशस्वी करण्याची जबाबदारी माझ्यावर असेल', असे भाष्य आमदार लंके यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याबाबत केले आहे.

विखेंकडून वारंवार होत असलेल्या टीकेवर बोलताना, 'ते मोठे आहेत. पिढ्यानपिढ्या त्यांनी राज्याचे नेतृत्व करत आलेत. माझ्यावर संस्कार झाल्याने मी मोठ्यांबद्दल बोलू शकत नाही,' असा टोला देखील आमदार लंकेने लगावला.

राज्यात भाजप महायुती सरकार आल्यापासून अनेक राजकीय प्रयोग होत आहेत. राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यातच काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना मिळालेले आहे. याचबरोबर आमदार अपात्रतेच्या निकालात देखील सर्व आमदार पात्र झाले आहेत. या सर्व विषयांवर आमदार नीलेश लंके (Nilesh lanke) यांनी, "जे काही होत आहे, ते बघत राहायचे", अशी भूमिका मांडली.

Nilesh Lanke, Sujay vikhe patil
Nilesh Rane Vs Bhaskar Jadhav : भास्कर जाधव - राणे वाद चिघळला; चिपळूणमध्ये ताफ्यावर दगडफेक

आमदार निलेश लंके म्हणाले, "मी आज्ञाधारक कार्यकर्ता आहे. पक्ष आणि पक्षाचे चिन्हाबाबतच्या निकालावर माझ्या वरिष्ठ नेत्यांनी भाष्य केले आहे. त्यावर मी भाष्य करणार नाही. लागलेल्या निकालावर मी समाधानी असून निर्णय विरोधात गेला असेल तर, मी देखील अपात्र झाला असतो. त्यामुळे मी यावर अधिक भाष्य करणार नाही".

नगर दक्षिण लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत आमदार निलेश लंके यांनी सस्पेन्स कायम ठेवला. ते म्हणाले, "माझ्या पक्षाचे नेतृत्वाने जबाबदारी दिल्यास मी यशस्वीपणे पार पाडेल. हे करताना माझ्यावर कोण काय टीका करत असेल, तर मी त्याकडे दुर्लक्ष करतो आणि कामाला महत्त्व देतो".

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खासदार विखेंकडून (Sujay vikhe) वारंवार होत असलेल्या टीकेवरही आमदार लंके यांनी मार्मिक भाष्य केले. "ते मोठे आहेत. पिढ्यान् पिढ्या त्यांनी राज्याचे नेतृत्व केले आहे. मी त्यांच्यासमोर छोटा आहे. माझ्यावर संस्कार झालेत. माझे आई-वडील शिक्षक होते. त्यांनी दिलेल्या संस्काराचे धडे मी गिरवत आहे. त्यांच्यासमोर मी छोटा असल्यामुळे मी त्यांच्यावर काही बोलणार नाही. आपण आपल्या उंचीनुसार बोलतो. माझी उंची ही कार्यकर्त्यांपर्यंत आहे. काल, आज आणि उद्या मी आमदार नव्हतो, असे समजून कार्यकर्ताच असल्याचा विचार करून विखे करत असलेल्या टीकेकडे दुर्लक्ष करतो", असे आमदार लंके यांनी सांगितले.

(Edited by - Sachin Waghmare)

Nilesh Lanke, Sujay vikhe patil
Nilesh Lanke : बाहेरच्यांचे ऐकून डफडे वाजवू नका; आमदार लंकेंनी विखे समर्थकांना सुनावले

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com