Eknath Shinde Ayodhya Visit: निघाले अयोध्येला...पोहोचले सुलतानपूरला ! अयोध्या दौऱ्यात नक्की घडलं काय?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौ-यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी विशेष रेल्वेगाडी केली होती.
Eknath Shinde ayodhya Visit
Eknath Shinde ayodhya Visit Sarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde Ayodhya Visit: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौ-यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी विशेष रेल्वेगाडी केली होती.या गाडीबाबत अनेक गमती घडल्या.धक्कादायक म्हणजे अयोध्येत निघालेली ही गाडी मध्यरात्री चक्क सुलतानपूरला पोहोचली. नाशिकहून खासदार गोडसे यांनी ००१६४ ही नाशिक अयोध्या ही विशेष गाडी केली होती. त्यात एक हजार पदाधिकारी व कार्यकर्ते होते. सायंकाळी पाचला ही गाडी रवाना झाली.

या गाडीत नांदगाव, मालेगावसह नाशिकचे कार्यकर्ते होते. मात्र ही विशेष गाडी असल्याने त्यात घडलेले प्रसंगही विशेषच होते. या गाडीत पालकमंत्री दादा भुसे यांच्या मतदारसंघातील समर्थक मनमाडहून बसणार होते. त्यासाठी त्यांचे एक खंदे समर्थक समर्थक कार्यकर्त्यांना बसण्यासाठी जागा मिळावी यासाठी नाशिक रोड स्थानकावरूनच बसले होते. ते सातत्याने मनमाडला थांबलेल्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात होते. ते सतत माहिती देत होते. त्यांनी त्या बोगीवर मालेगाव बाह्य मतदारसंघाचे स्टीकर चिकटवले होते.

Eknath Shinde ayodhya Visit
Hearing On Local Body Election: आज तरी सुनावणी होणार की नाही?

या बोगीत आधीच जागा व्यापल्या होत्या.पदाधिकारी आणि माध्यमकर्मी त्यात होते.मनमाड स्थानकावर गाडी पोहोचली, तेव्हा जवळपास शंभर जण बोगीत शिरले मात्र जागाच नव्हती. त्यामुळे प्रचंड वाद झाला. तेव्हढ्यात गाडी सुरू झाली. मग या कार्यकर्त्यांनी गाडी रोखली. समजावून सांगणा-या पदाधिकाऱ्यांचाही समाचार घेतला. पोलिसांनी हस्तक्षेप करूनही प्रश्न सुटेना. पालकमंत्री, खासदार व अनेक पदाधिकाऱ्यांकडून फोनवर समजून सांगितले. त्यातूनही प्रश्न न सुटता वादाचे रूपांतर गोंधळात झाले. हमरीतुमरीवर प्रकरण आले. त्यात काही माध्यमकर्मी उतरून निघून गेले. मालेगावचे काही कार्यकर्ते देखील परत निघून गेल्याने वादाची ठिणगी पडली.

अशा अनेक गमती या रेल्वेगाडीत घडल्या. ही गाडी मुख्य स्थानकावर न थांबता स्थानकापासून दूर तसेच फलाट नसलेल्या ठिकाणी थांबत होती. मोठी गंमत म्हणजे लखनौ स्थानकातून निघाल्यावर ती अयोध्येला जाणार होती. पण ती वेगळ्याच मार्गावर व अगदी स्टेशन नसलेल्या मार्गावर धावत होती. बहुतांश प्रवासी निद्रिस्त होते. जे जागे होते गोंधळात होते.

Eknath Shinde ayodhya Visit
Anil Deshmukh News : 'ती' गर्दी बघून भाजप नेते धास्तावले, म्हणून मैदानाचे राजकारण सुरू !

काहींनी गुगल जीपीएस ऑन केले ते जास्तच गोंधळले कारण अयोध्येचे अंतर कमी नव्हे वाढत होते. काही वेळाने गाडी थांबली ते स्थानक होते सुलतानपूर. मार्ग होता गोरखपूर-नेपाळ. गाडी थांबली नसती तर दोन तासांनी कदाचीत ती नेपाळच्या सीमेवर धडकली असती. वेळीच लक्षात आल्याने गाडी थांबली. इंजिन काढून मागच्या डब्याला लावण्यात आले व गाडी परत फिरली.

मध्यरात्री बाराला अयोध्येला पोहोचणारी गाडी पहाटे पाचला अयोध्येला पोहोचली व थकलेले, मरगळलेले प्रवाश्यांचा जीव भांड्यात पडला. जाना था रंगून, पहुंच गये चीन समझ गये ना या गाण्यासारखे... जाना था जपान, पहुंच गये चीन समझ गये ना...सुलतानपूर जंक्शन. एकनाथ शिंदे गटाची अयोध्येला निघालेली विशेष रेल्वे वाट चुकली. ३३ तासांच्या प्रवासानंतर अयोध्येऐवजी सुलतानपुर जंक्शनला पोहोचली.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com