जळगाव : एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषद उमेदवारी दिली असली तरी त्यांना यश मिळविण्यासाठी तीन ते चार मतांची बेगमी करावी लागणार आहे. यात जळगाव जिल्ह्यातून एका मताची 'सावकारी'निश्चित मानली जात आहे.तर इतर दोन तीन मतांची बेगमी ते निश्चित करतील, असे संगितले जात आहे. (Jalgaon latest Marathi News)
भारतीय जनता पक्षात (bjp) असताना खडसे यांनी अनेकांना आमदार बनण्यास मदत केली आहे. त्या वेळी काही जणांना इतर पक्षातून भाजप त प्रवेश देऊन त्यांना उमेदवारी देवून निवडून आणले.
त्यामुळे आता त्यांना खडसेना (Eknath Khadse)आमदारकीचे राजकीय बळ देण्यासाठी परतफेड करण्याची वेळ आली आहे. त्यांनी खान्देशात भाजपला नंदुरबारचा 'विजय' मिळवून दिला आहे,तर भुसावला 'संजय' यांची सावकारी शाबूत ठेवली आहे. (Eknath Khadse News)
नगरच्या एकाच्या हातात पाटी देऊन त्यांना कमळ गिरवायला लावले. तर विदर्भातही त्यांच्या बळावर काही कमळ हातात देऊन आमदार केले आहेत.त्यामुळे आता त्यांची कसोटी आहे. गुप्तमतदान पद्धतीत त्यांना ही परतफेड शक्य आहे.
भुसावळची 'सावकारी' त्यांच्या बाजूने निश्चित मानली जात आहे. जळगावचे मामा एकेकाळी त्यांचे समर्थक असले तरी त्यांच्या पायात पक्षाने जिल्हा अध्यक्षपदाची बेडी अडकवली आहे. त्यामुळे ही बेगमी अवघड मानली जात आहे.पण अश्यक्य नाही.
राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीनेही परिषदेची निवडणूक अधिक गांभीर्याने घेतली आहे. अपक्षांमध्ये बहुजन विकास आघाडीकडे अधिक मते असल्याने हितेंद्र ठाकूर यांची मनधरणी करावी लागणार आहे.
विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जून रोजी निवडणूक होणार आहे. १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात असल्याने घोडेबाजार होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.