Nashik News : उमेदवारीसाठी भाजपकडे प्रयत्नशील असलेल्या ॲड. नितीन ठाकरे यांनी आता आपला राजकीय मार्ग बदलण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपच्या ट्रॅकवर चालताना आता एकदमच त्यांनी आपला ट्रॅक वळवून शरद पवार गटाच्या दिशेने वळले आहेत. ठाकरे यांनी काल बारामती येथे शरद पवार यांची भेट घेतली. ठाकरे यांची ही भेट आता चर्चेचा विषय ठरली आहे. (Latest Marathi News)
नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे नाशिक लोकसभा मतदारसंघातून इच्छुक उमेदवार आहेत. ते भाजपचे सदस्य आहेत. मविप्र संस्थेच्या निवडणुकीत ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या आशीर्वादाने सत्तेत आले होते. मात्र, गेली दोन महिने लोकसभेच्या उमेदवारीसाठी त्यांनी भाजपकडे अथक प्रयत्न केले होते. मात्र, त्यातून त्यांना फारसे काही निष्पन्न न झाल्याने अखेर त्यांना आपला राजकीय मार्ग बदलावा लागल्याचे दिसते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
ॲड. ठाकरे यांनी संस्थेच्या काही पदाधिकाऱ्यांसह बारामती येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. या वेळी पदाधिकाऱ्यांनी व ठाकरे यांनी नाशिक मतदारसंघातून महाविकास आघाडीची उमेदवारी मिळावी, अशी विनंती केली. मात्र, पवार यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर ही जागा आमच्याकडे नाही. नाशिक मतदारसंघ शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडे आहे. त्यामुळे तुम्ही त्यांना भेटावे. या शब्दात त्यांना सूचक उत्तर दिले. त्यानंतर हे शिष्टमंडळ माघारी नाशिकला परतले.
नितीन ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी समर्थकांचा मेळावा घेतला होता. या मेळाव्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षाकडे उमेदवारीसाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांनी भाजपच्या विविध नेत्यांकडे संपर्क केला होता. नाशिकचा मतदारसंघ भाजपलाच मिळेल, या अपेक्षेने त्यांनी विविध नेत्यांना उमेदवारीसाठी लिखित विनंतीदेखील केली होती.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यातदेखील ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली. या सर्व प्रयत्नानंतर त्यांच्या उमेदवारीबाबत निर्णय होऊ शकला नाही. भाजपकडे अनेक दिग्गज उमेदवार प्रयत्नशील असल्याने राजकीय अस्थिरता निर्माण झालेली आहे. या स्पर्धेत आपला निभाव लागेल की नाही? हा विचार ठाकरे यांनी केला असावा असे बोलले जाते.
दरम्यान, शिवसेनेने (Shiv Sena) गेल्या दोन आठवड्यांत नाशिक मतदारसंघात उमेदवारीसाठी विविध प्रयत्न केले होते. पक्षाबाहेरच्या काही नेत्यांचीदेखील त्यांनी चाचणी केली होती. त्यानंतर झालेल्या आढाव्यामध्ये सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे आणि जिल्हाप्रमुख विजय करंजकर या दोन नावांवर शिवसेना ठाकरे गटाचा शोध स्थिरावला आहे. त्यात माजी आमदार वाजे यांना बहुतांश पदाधिकाऱ्यांनी पसंती दिली आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आता पक्षाचाच उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीचे पडघम वाजत असल्याने शरद पवार यांची भेट घेतल्यावर ठाकरे यांनी शिवसेना नेत्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर असल्याने आणि खासदार संजय राऊत अन्य कामात व्यस्त असल्याने ठाकरे यांची भेट हाेऊ शकली नाही. या सर्व राजकीय घडामोडींमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार कोण असेल?. त्यात नितीन ठाकरे यांना ऐनवेळी संधी मिळेल का? ही चर्चा सुरू झाली आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.