Lok Sabha Election 2024 : महायुतीमध्ये भडका; हेमंत गोडसेंच्या उमेदवारीवर भाजपची फुली

Hemant Godse News : श्रीकांत शिंदे यांनी काल गोडसेंची उमेदवारी जाहीर करून राष्ट्रवादी व भाजपला थेट आव्हान दिले आहे. त्यानंतर आता भाजपमुळे गोडसेंचे टेन्शन वाढले आहे.
Keda Aher, Hemant Godse
Keda Aher, Hemant GodseSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी काल नाशिक लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे त्यांनी एका दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा होती. पण शिंदेंची ही चाल भाजपने उलथून टाकली आहे. त्यांच्या घोषणेवर सहकारी पक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर (Lok Sabha Election 2024) महायुतीत नाशिकच्या उमेदवारीवरून भडका उडण्याची चिन्हे आहेत.

महायुतीचे (Mahayuti) जागावाटप अद्याप झालेले नाही. जागावाटपाचे सूत्र ठरायचे आहे. कोणत्या पक्षाला किती व कोणत्या जागा मिळणार, याबाबत वरिष्ठ स्तरावर चर्चा सुरू आहे. त्यावरून महायुतीच्या तीन घटक पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळते आहे. अशातच आता शिवसेनेच्या (Shiv Sena) एका निर्णयाने भाजपच्या (BJP) पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे सूर आळवले जाऊ लागले आहेत.

Keda Aher, Hemant Godse
Nashik Nana Bachhav News : मराठा समाज लोकसभा निवडणुकीत करणार भाजपची कोंडी!

शिवसेनेचा मेळावा काल नाशिक येथे झाला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा असल्याने त्यात निवडणुकीच्या व उमेदवारीच्या चर्चा झाल्याच. या वेळी शिंदे गटाचे नेते खासदार श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे (Hemant Godse) यांना आपल्याला तिसऱ्यांदा लोकसभेत पाठवायचे आहे. तेच आपले उमेदवार असतील, त्यांच्यासाठी तळमळीने कामाला लागा अशा सूचना दिल्या. त्यातून शिंदे गटातर्फे नाशिक (Nashik News) मधून विद्यमान खासदार गोडसे हे उमेदवार असतील असा संदेश गेला.

शिंदेंच्या घोषणेचे तीव्र पडसाद भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उमटले आहेत. पक्षाचे कार्यकर्ते गेली वर्षभर नाशिक मतदारसंघात काम करीत आहेत. त्यांच्याकडे विविध इच्छुक जोरदार प्रचारदेखील करीत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने एकतर्फी निर्णय जाहीर केल्याने नाशिक लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख केदा आहेर (Keda Aher) यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या संदर्भात केदा आहेर यांनी 'सरकारनामा'ला सांगितले की, भाजपसाठी लोकसभेची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे. देशात 400 हून अधिक जागा जिंकण्याचा आमचा निर्धार आहे. त्यामुळे प्रत्येक जागा व उमेदवाराबाबत आम्ही अतिशय गांभीर्याने व अभ्यास करून निर्णय घेत असतो. नाशिकच्या जागेबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. असे असताना एखाद्या राजकीय मेळाव्यात उमेदवारीची घोषणा करणे हे कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी ठीक आहे. मात्र, ते वास्तवात उतरेल याची हमी देता येत नाही.

महायुतीचे घटक पक्ष कोणत्या जागा लढवाव्यात, याबाबतचा निर्णय वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत घेतील. जागावाटप झाल्यानंतर कोणता मतदारसंघ कोणत्या पक्षाला मिळेल हे ठरणार आहे. मतदारसंघ ठरल्यानंतरच संबंधित पक्षाच्या नेत्यांनी बैठक घेऊन उमेदवार जाहीर करायचे असतात. यातील कोणतीही प्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे नाशिक मतदारसंघात कोणाची उमेदवारी जाहीर झालेली असेल तर ते मान्य करण्यास आम्ही तयार नाही. सहकारी पक्षांना विश्वासात घेऊन प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. त्याशिवाय निवडणुकीत सहकारी पक्ष व त्यांचे कार्यकर्ते एक दिलाने काम कसे करतील, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

एकंदरीत महायुतीमध्ये जागावाटपावरून मोठी रस्सीखेच दिसते आहे. यात भारतीय जनता पक्षाला जास्तीत जास्त जागा हव्या असल्याने सहकारी पक्षांवर राजकीय दबाव निर्माण झाला आहे. सहकारी पक्षांमध्ये आमदार आणि पदाधिकाऱ्यांचादेखील जागा मिळवण्याबाबत तेवढाच दबाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाकडूनदेखील उमेदवार देण्याची तयारी सुरू आहे. भारतीय जनता पक्षाकडेदेखील उमेदवार आहेत. त्यामुळे हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर झाल्यावर त्याचे राजकीय पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे.

R

Keda Aher, Hemant Godse
Sangram Jagtap News : नगरच्या नामांतरासाठी संग्राम जगताप मैदानात; अजित दादांना साकडं

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com