Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याचे नाव 'पु्ण्यश्लोक अहिल्यादेवीनगर' करण्याचा विषय राज्य सरकारने आज होत असलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करावा, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आमदार संग्राम जगताप यांनी निवेदनाद्वारे केली. धनगर समाजाचे नेते आमदार दत्ता भरणे, आमदार नितीन पवार, सुरेश बनसोडे या वेळी उपस्थित होते. (Latest Marathi News)
अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर करण्याच्या मागणीवर आजच्या मंत्रिमंडळात काही निर्णय होतो का, याकडे आता लक्ष लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून अहमदनगरच्या नामांतर आणि विभाजनाचा विषय गाजत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस DCM Devendra Fadnavis यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडी (ता. जामखेड) येथील कार्यक्रमात नामांतराची घोषणा केली होती. यानंतर हा मुद्दा काहीसा मागे पडला होता. राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आता आमदार जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार DCM Ajit Pawar यांची भेट घेऊन निवेदन दिल्याने हा विषय पुन्हा ताजा झाला आहे.Ahmednagar To Be Renamed Punyashlok Ahilyadevi Nagar
अहमदनगर ( Ahmednagar )जिल्ह्याचे नामकरण व्हावे, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्ववादी संघटनांनी लावून धरली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने नामांतराच्या मुद्द्यावर आक्रमक आंदोलन केले आहे. अंबिकानगर हे नाव 'मनविसे'ने लावून धरले होते. 'मनविसे'चे Maharashtra Navnirman Sena महाराष्ट्र उपाध्यक्ष सुमित वर्मा यांनी नगर शहरातील प्रमुख कायनेटिक चौकात अंबिकानगर नामांतराचा फलकदेखील झळकवला होता. पुढे नगर जिल्ह्याचे नामांतर 'पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर'ची मागणी जोर धरू लागली. भाजप आमदार प्रा. राम शिंदे, आमदार गोपीचंद पडळकर यांनी तसे राज्य सरकारला पत्र लिहिले.
या मागणीला हिंदुत्ववादी संघटनांनीदेखील पाठिंबा दिला. भाजप महायुतीच्या सरकारने अहमदनगर जिल्ह्याचे 'पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर' नामांतराची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली. भाजप महायुती Mahayuti सरकारशी मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा चांगला समन्वय असल्याने नगरमधील 'मनविसे'च्या नेत्यांनी अंबिकानगर नावावरून काहीशी माघार घेत 'पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर' Punyashlok Ahilyadevi Nagar नामांतराचे स्वागत केले.
राज्य सरकारने महापालिकेला पत्र लिहून नामांतराचा ठराव समंत करून पाठवण्याचा आदेश केला. प्रशासक तथा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी हा ठराव मंजूर करत, तो जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांकडे पाठवला आहे. हा प्रस्ताव आता पुढे राज्य सरकारकडे सादर होईल. दरम्यान, महापालिकेच्या नामांतराच्या ठरावावर वैचारिक संघटनांनी विरोध दर्शवला आहे. तसेच एमआयएम आणि समाजवादी पक्ष यांसारख्या संघटनांनी या ठरावावर आक्षेप घेतला आहे. जिल्हाधिकारी यांना निवेदन देत नामांतराच्या ठरावाला विरोध दर्शवला असून, नामांतर हे राजकीय स्वार्थासाठी घातलेला घाट आहे, असा आरोप समाजवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
यातच राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर आमदार संग्राम जगताप, आमदार दत्ता भरणे आणि आमदार नितीन पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन नामांतराचा ठराव मंजूर करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Edited By: Rashmi Mane
R
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.