Chhagan Bhujbal News : नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढवणार? भुजबळांनी स्पष्टच सांगितलं

Chhagan Bhujbal On Eknath Shinde : उमेदवारीबाबत चर्चा चालू असतानाच भुजबळांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

मी उमेदवार असेल हे माध्यमांनीच पसरवले आहे. मी कधीच उमेदवारीविषयी बोललो नाही. मी फक्त एवढेच म्हटलं आहे की, अजित पवार गटाला शिवसेनेच्या शिंदे गटाएवढ्याच जागा मिळायला हव्यात, असे स्पष्टीकरण अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी दिले.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते भुजबळ ( Chhagan Bhujbal ) आज नाशिकला प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. लोकसभा निवडणुकीत आपण उमेदवार असणार का? यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, "मी निवडणूक लढवणार असे कधीच म्हणाले नाही. मात्र, महायुतीच्या जागावाटपात शिवसेनेच्या शिंदे गटाएवढ्या जागा आम्हालाही मिळाव्यात, असे मी बोललो होतो."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"नाशिकची जागा कोणाला? याबाबतचा निर्णय महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी घ्यायचा आहे. त्याबाबत बहुतांशी जागांविषयी त्यांचे एकमत झाले आहे. काही जागांबाबत चर्चा सुरू आहे. ही चर्चा झाल्यावर तीनही पक्षांना किती जागा मिळणार, हे ठरेल. मतदारसंघ निश्चित झाले की, मग उमेदवारीबाबत चर्चा होऊ शकेल. नाशिक मतदारसंघ सध्या आमच्याकडे नाही. हा मतदारसंघ राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळाल्यास आमच्याकडे अनेक पात्र उमेदवार आहेत. पक्ष त्यांच्याशी चर्चा करून योग्य तो उमेदवार ठरवेल," असंही छगन भुजबळांनी सांगितलं.

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal News: 'त्या' पराभवाची सल भुजबळांच्या मनातून काही केल्या जाईना !

"नाशिक मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावा म्हणून मागणी करण्यात आली आहे. पण, पक्षाला जागावाटपाविषयी चर्चा करण्यासाठी अशा मागण्या कराव्या लागतात. त्याशिवाय चर्चा व जागा मिळत नाही. त्यामुळे राष्ट्रवादीने जागा मागितल्याने शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी अस्वस्थ होऊ नये. त्यांनी निश्चित असावे. ज्या कोणाला जागा मिळेल आणि उमेदवारी मिळेल त्याचा प्रचार आम्ही सगळे एक दिलाने करणार आहोत. कारण तो महायुतीचा उमेदवार असेल," असं भुजबळांनी म्हटलं.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा अथवा मतदारसंघाबाबत बोलणे झालेले नाही, असे भुजबळ यांनी सांगितले. ते म्हणाले, "आमच्या संस्थेने फार पूर्वी सिडकोमध्ये शैक्षणिक कामासाठी एक भूखंड खरेदी केला होता. त्याबाबत काही समस्या निर्माण झालेल्या आहेत. नगर विकास खाते हे मुख्यमंत्र्यांकडे आहे. त्यामुळे त्यांना भेटलो. अवघ्या पाच मिनिटांची ही भेट होती."

R

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal News: भुजबळ नाशिक लोकसभेच्या मैदानात उतरणार? कार्यकर्त्यांकडून टीझर व्हायरल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com